महाराष्ट्राचे द्वितीय मुख्यमंत्री स्व मा. सा. कन्नमवार यांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवानिमित्त 10 जानेवारीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चंद्रपूरात
लोकस्पर्श न्युज नेटवर्क,
चंद्रपूर: शुक्रवार 10 जानेवारी रोजी चंद्रपूरच्या प्रियदर्शिनी सांस्कृतिक सभागृहात राज्याचे व्दितीय मुख्यमंत्री, जिल्ह्याचे सुपुत्र स्व. मा. सा. कन्नमवार यांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हजेरी लावणार आहेत. रौप्य महोत्सव समिती आणि स्वागताध्यक्ष आमदार किशोर जोरगेवार यांच्या निमंत्रणानंतर ते या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा चंद्रपूरचे सुपुत्र आहेत. त्यामुळे या कार्यक्रमाला त्यांची उपस्थिती राहावी अशी विनंती महोत्सव समितीच्या वतीने करण्यात आली होती. आता महोत्सव समितीच्या वतीने कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे.10 जानेवारीला या निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी कर्मवीर कन्नमवार यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला माल्यार्पण करण्यात येणार आहे. तर 9 वाजता वसंत भवन येथून प्रभात फेरी काढण्यात येणार आहे. यात शाळकरी विद्यार्थी सहभागी होणार आहेत. दुपारी 12 वाजता प्रियदर्शिनी सभागृहात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन होणार आहे.
गडचिरोली वनविभागाच्या नियोजनशून्यतेमुळे उद्यानाची लागली “वाट”
Comments are closed.