Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

राज ठाकरेंच्या भूमिकेवर संजय राऊतांचा हल्लाबोल

तर आज राज्यात चित्र वेगळं असतं

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला जोरदार झटका बसला आहे. या निवडणुकीत हाराकिरी झाल्याने त्यांची किरकिर वाढल्याचा आरोप महायुतीमधून करण्यात येत आहे. तर हा निकाल मान्य नसल्याचे उद्धव ठाकरे सेना आणि काँग्रेसनी भूमिका घेतली आहे. इतका एकांगी निकाल लागल्याने हा ईव्हीएमचा निकाल असल्याचा दावा महाविकास आघाडीकडून करण्यात येत आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

निकालाच्या दिवशी पहिल्या दोन तासात बरोबरची लढाई होती. परंतु इव्हिएम मधील गडबडीमुळे असा  निकाल लागल्याचा आरोप महाविकास आघाडीकडून करण्यात येत आहे.  मात्र हा निकाल आधीच ठरलेला होता फक्त मतदान होऊ  द्यायचे होते असा आरोप संजय राऊतांनी  केलेला आहे तसेच ह्या सगळ्याला सुप्रीम कोर्टचे माजी सरन्यायाधीश चंद्रचूड हे जबाबदार आहेत. घटनात्मक पेचावर अडीच वर्ष निर्णय देऊ शकले नाही त्यामुळे  त्यांना माफ करणार नाही. त्यांनी निर्णय दिला नसल्यामुळे  .आमदारांमध्ये पक्ष बदलण्याची भीती राहिली नाही. वंचित, आणि मनसे ह्यांचे उमेदवार उभे केले होते त्यामुळे  मतविभागणी झाली. त्याचा  मोठा फटका महाविकास आघाडीला बसला  राज ठाकरे यांच्या या भूमिकेवर संजय राऊतांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.

 

Comments are closed.