दिव्यांग मोफत सहाय्यता शिबिराला सर्च मध्ये सुरवात
लोकस्पर्श न्युज नेटवर्क,
गडचिरोली: सर्च हॉस्पिटल चातगाव, गडचिरोली येथे आज दिनांक 19 डिसेंबर 2024 ला दिव्यांग मोफत सहाय्यता शिबिराला सुरवात झाली. सर्च हॉस्पिटल आणि श्री भगवान महावीर विकलांग सहायता समिती जयपूर यांच्या सहकार्याने या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक 19 ते 21 असे तीन दिवस या शिबिराचा लाभ दिव्यांग व्यक्तींना घेता येणार आहे.
अपंगत्व असलेल्या व्यक्तींची आवश्यक तपासणी करून मोफत सहाय्य उपकरणे शिबिरात वितरित केली जाणार आहेत. दिव्यांग व्यक्तींना त्यांच्या जीवनशैलीत सुधारणा घडवून आणण्यास मदत करणे आणि त्यांना स्वावलंबी बनवणे आहे हे प्रमुख उद्दिष्टे या शिबिराचे आहे. यामध्ये कृत्रिम पाय आणि हात, कॅलिपर, चालण्याच्या काठ्या, कुबड्या, व्हीलचेअर्स आणि श्रवणयंत्रे यांचा समावेश आहे. या शिबिराद्वारे विविध सहाय्य उपकरणांची मोजमाप, बनावट, फिटिंग आणि वितरण करण्यात येणार आहे, ज्यामुळे दिव्यांग व्यक्तींना त्यांच्या दैनंदिन जीवनात सुलभता येईल.
शिबिरात वैद्यकीय तज्ञ, तंत्रज्ञ आणि स्वयंसेवकांच्या मदतीने या उपकरणांचे मोजमाप, बनावट, फिटिंग आणि वितरण करण्यात येईल. शिबिरात सहभागी होणाऱ्या लाभार्थींनी आधार कार्ड, अपंग प्रमाणपत्र आणि स्वतःचा फोटो सोबत आणणे आवश्यक आहे. या शिबिराचा लाभ जास्तीत जास्त दिव्यांग व्यक्तीने यासाठी सर्च दवाखाना तर्फे आवाहन करण्यात येत आहे.
Comments are closed.