जेष्ठ ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट;
भेटीनंतर केलं मोठं विधान...
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
मुंबई : २०२४ मध्ये राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला भरगोस यश मिळlलेलें असून राज्य मंत्रिमंडळ विस्तार झालेला आहे. मंत्रिमंडळ विस्तारात माजी उपमुख्यमंत्री व जेष्ठ ओबीसी नेते छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले नसल्याने ते प्रचंड नाराज असून हिवाळी अधिवेशन सोडून ते थेट नाशिकला रवाना झाले.
मागील काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडत असून भाजप-शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस या महायुतीतील तीनही पक्षांचे देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात सरकार स्थापन झाले आहे. त्यामध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह मंत्रिमंडळातील ३९ मंत्र्याचा शपथविधी सोहळा पार पडला. परंतु माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलेले नाही. त्यानंतर त्यांनी नाशिक येथे राज्यातील ओबीसी नेत्याचा मेळावा घेवून आपली भूमिका स्पष्ट करत भविष्यात वेगळा निर्णय घेण्याची शक्यता वर्तवली आहे.
त्यानंतर दुस-याच दिवशी त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. भेटी दरम्यान ते म्हणाले की, ‘ महायुतीच्या विजयात ओबीसीचा मोठा वाटा आहे . त्यांचे सोबत पुत्र व माजी खासदार समीर भुजबळ हे देखील होते. राज्यात ज्या घडामोडी होत आहेत त्यावर चर्चा केलेली असून चर्चा सकारात्मक झालेली आहे. मुख्यमंत्री फडणवीसांनी सर्व म्हणणं ऐकून घेतलेले असून ओबीसीचा आशीर्वाद, पाठिंबा मिळाल्यामुळेच महायुतीला मोठा विजय मिळाल्याचे भेटी दरम्यान कबुल केले.
मुख्यमंत्र्यांनी छगन भुजबळ यांना आठ ते दहा दिवसाचा वेळ मागितलेला असुन काहीतरी नवीन मार्ग शोधून काढू’ असे आश्वासन दिल्याचे भुजबळ यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या भेटीला गेल्याने चर्चांना उधाण आले आहे.
हे ही वाचा,
स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानंतरही गावात सोयी-सुविधांचा अभाव, प्रशासनाचे दुर्लक्ष
Comments are closed.