Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

शिवसेना अद्याप वेटींगवर !

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

मुंबई, 20, सप्टेंबर :-  दसरा मेळावा आणि शिवसेनेचे अतूट नाते आहे.परंतु मुंबई महानगरपालिकेने शिवसेनेला दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदानावर परवानगी दिलेली नाही. त्यामुळे मैदानाची शिवसेना अद्याप वेटींगवरच असल्याचे दिसून येत आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या जी-उत्तर कार्यालयाबाहेर आक्रमक पवित्रा घेत परवानगी मिळो अथवा न मिळो आम्ही शिवाजी पार्क वरच उपस्थित राहू असे प्रतिपादन शिवसेनेचे उपनेते माजी महापौर मिलींद वैद्य यांनी केले आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

दरम्यान काल ईडी न्यायालयाच्या बाहेर अटकेत असलेले शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रसिध्दी माध्यमांसमोर असे सांगितले की , जर दसरा मेळाव्याला परवानगी
मिळाली नाहीतर शिवसैनिक शिवाजी पार्क मध्ये घुसून मेळावा साजरा करतील असे सांगितले तर शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनीही अशीच भूमिका काल मांडली होती.

२२ ऑगस्ट रोजी शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयाकडून दसरा मेळाव्यासाठी महापालिकेकडे पहिल्यांदा अर्ज करण्यात आला होता. त्यानंतर आज २० सप्टेंबर पर्यंत दोन वेळा पत्र आणि तीन वेळा प्रत्यक्ष भेट विभाग अधिकाऱ्यांची घेतल्याचे वैद्य यांनी सांगितले. महापालिकेने शिवसेनेला असे पत्र दिले आहे की जोपर्यंत विधी विभागाकडून निर्णय होत नाही तोपर्यंत आम्हाला तुम्हाला उत्तर देता येणार नाही.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

दरम्यान शिवसेनेकडून असा आरोप केला जात आहे की पूर्वी दोन ते तीन दिवसांत मेळाव्याला परवानगी मिळायची आता एक महिना उलटला तरी परवानगी मिळालेली नाही.त्यावरून पालिका प्रशासनावर दबाव आहे हे नक्कीच! त्यामुळे शिवसैनिकांची डोकी भडकावित आणि कायदा व सुव्यवस्था बिघडावी अशी प्रशासनाची मनीषा आहे का ? असा सवाल मिलिंद वैद्य यांनी केला आहे.

हे देखील वाचा :- 

गडचिरोली जिल्ह्यातील कलाकार झळकणार टीव्हीवर…..

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना कोर्टाने ठोठावला १० लाखाचा दंड !

Comments are closed.