Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना कोर्टाने ठोठावला १० लाखाचा दंड !

अनधिकृत बांधकाम पाडण्याचे आदेश.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

मुंबई, 20, सप्टेंबर :- मुंबई उच्च न्यायालयाने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना १० लाख रुपयांचा दंड ठोठावून दणका दिला आहे. राणे यांच्या जुहू येथील अधिश बंगल्यातील अनधिकृत बांधकाम तोडण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. राणे यांनी सीआरझेड कायदा आणि एफएसआयचे उल्लंघन केल्याचे उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आले आहे. समुद्र किनारी असलेला हा बंगला सीआरझेड कायद्याचे उल्लंघन करून बांधला असल्याचे निरीक्षण उच्चन्यायालयाने नोंदविले आहे.

मुंबई महानगरपालिका कायदा १८८८ अंतर्गत सेक्शन ४८८ नुसार राणेंना महानगरपालिकेने नोटीस पाठविली होती. त्यानंतर महानगरपालिकेने बांधकाम तोडण्याची नोटीस बजावली होती. त्यावरून राणे यांनी कोर्टात धाव घेतली होती. त्यावेळी ही कारवाई महानगरपालिकेने मविआ सरकारच्या दबावाखाली केली असल्याचा आरोप राणे आणि भाजपाने केला होता.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे देखील वाचा :-

गडचिरोली जिल्ह्यातील कलाकार झळकणार टीव्हीवर…..

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.