Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

मिरजेत वन्यप्राण्याची कातडी आणि अवशेष तस्करी

बिबट्याचे कातडे, सांबरचे शिंगे व 18 किलो खवल्या मांजरचे खवले जप्त, 28 लाखाचा मुद्देमाल सह तस्कर जेरबंद, महात्मा गांधी चौकी पोलिसांची कारवाई

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

मिरज,  29, ऑक्टोबर :- मिरजेत बिबट्या चे कातडे, सांबरची दोन शिंगे व खवल्या मांजराचे सुमारे 18 किलोचे खवले असा 28 लाखाचा माल मुद्देमाल सह तस्कराला जेरबंद करण्यात महात्मा गांधी चौकी पोलिसांना यश मिळाले आहे. ही कारवाई महात्मा गांधी पोलीस ठाणे आणि सांगली वन्य विभागाने संयुक्त रित्या केली आहे. अशोक सदाशिव कदम (55) राहणारा कदमवाडी राधानगरी कोल्हापूर असे आरोपीचे नाव आहे.

मिरज पोस्ट ऑफिस जवळ जकात नाक्यासमोर एक इसम हा वन्य प्राण्याचे कातडी तस्करी करण्यासाठी येणार असल्याची खात्रीलायक माहिती महात्मा गांधी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस तसेच सहायक वनपाल युवराज पाटील यांच्या पथकाला मिळाली होती.  त्या ठिकाणी छापा मारून एका इसमाला ताब्यात घेण्यात आले.  त्याच्याकडे दोन प्लास्टिक पोत्याची झडती घेतली असता पोत्या मध्ये बिबट्या चे कातडे, सांबरची दोन शिंगे व खवल्या मांजराच्या अंगावरील सुमारे 18 किलो वजनाचे खवल्या आढळून आले. वन्य प्राण्यांची कातडी तस्करी करणाऱ्या अशोक सदाशिव कदम  याला पोलिसांनी अटक करून 28 लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे. अशोक सदाशिव कदम याला पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

ही कारवाई पोलीस अधीक्षक बसवराज तेली अप्पर पोलीस अधीक्षक मनीषा डुबले, उपविभागीय पोलीस अधीक्षक अशोक वीरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनी रविराज फडणीस, उपनिरीक्षक राजू अन्नछत्रे, कुमार पाटील, सोमनाथ कचरे, प्रमोद खाडे यांच्या सह पथकाने  केली आहे. सपोनि रविराज यांनी यापूर्वी रक्तचंदन, बिबट्याची कातडी , 50 किलो गांजा जप्त करून वन्यप्राणी तस्करी आणि अमली पदार्थ तस्करीच्यावर मोठी कारवाई केली होती.

हे देखील वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.