Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी नवीन पक्ष काढणार असल्याची केली घोषणा.

सध्याच्या राजकारणाला कंटाळून

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

आम आदमी पक्षाच्या संस्थापक सदस्य असलेल्या अंजली दमानिया यांनी आप सारख्या पक्षाला कंटाळून त्यातून बाहेर पडणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आता नवा पक्ष स्थापण करणार अशी घोषणा केली आहे.

सध्याची  महाराष्ट्राची  विधानसभा निवडणूक संपलेली आहे. परंतू निकलानंतरची परिस्थिती पाहता  पक्ष फोडणे, पैसे वाटणे हे सर्व पाहून सध्याचे राजकारण हाताबाहेर जात असल्त्यायाचे निदर्शनास येत असल्याने स्वताचा  एक  राजकीय पक्ष स्थापन करायचा निर्णय घेतलेला असून  लवकरच पक्षाचे नाव आणि चिन्हं याबाबत निर्णय घेण्यात येईल असे अंजली दमानिया यांनी म्हटले आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

आम्हाला विधान सभेत  जावून मिरवायची हौस नाही. परंतु पक्षात इतकी वर्षे काम करणारी लोकं या पक्षातून त्या पक्षात जात आहेत त्तयामुळे  आम्हाला महाराष्ट्राचे राजकारण सुधारायचं आहे असे अंजली दमानिया यांनी सांगितले. राजकीय पार्टी बनविण्यासाठी आज आपण पहिली बैठक झाली आहे. यावेळी पक्षाची भूमिका मांडताना हा पक्ष शेतकऱ्यांचा, ऊस तोड कामगारांचा असणार आहे.  तरुण लोकांना सोबत घेऊन आपला पक्ष सिद्धांतांवर राजकारण करेल असेही अंजली दमानिया यांनी यावेळी सांगितले.

मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण जातीजाती मध्ये भांडण यामुळे राज्याची प्रगती झपाट्याने होत  नाही  हा देश प्रगतीच्या मार्गांवर न्यायचा असेल तर आधी भारतीय आहोत हे लक्षात घेतले पाहीजे.असेही अंजली दमानिया यांनी सांगितले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.