सर्च हॉस्पिटल चातगाव येथे विशेष फिजिओथेरपी ओपीडीचे आयोजन
र्च हॉस्पिटल चातगाव येथे विशेष फिजिओथेरपी ओपीडीचे आयोजन
लोकस्पर्श न्युज नेटवर्क,
चातगाव : सर्च हॉस्पिटल, चातगाव येथे ११ जानेवारी २०२५ रोजी विशेष फिजिओथेरपी ओपीडीचे आयोजन करण्यात आले आहे. फिजिओथेरपी उपचार हे सांध्यांचे दुखणे, स्नायूंचे दुखणे, लचक भरणे, नस लागणे, तसेच ऑपरेशननंतर होणाऱ्या शारीरिक अडचणींवर प्रभावी ठरतात.
कंबर व पाठदुखी, मानदुखी, गुडघेदुखी, खांदेदुखी, घोटा व टाचदुखी, स्नायूंमध्ये जखडन, लकवा आणि हातापायांच्या हालचालींच्या त्रासासाठी फिजिओथेरपी उपचार अतिशय उपयुक्त मानले जातात. औषधोपचारासोबतच फिजिओथेरपीच्या विशेष पद्धतींमुळे अनेक शारीरिक समस्यांवर आराम मिळतो. यावेळी नागपूर येथील प्रसिद्ध फिजिओथेरपिस्ट डॉ. श्रुती गोहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली उपचार केले जाणार आहेत. या उपचारात आयएएसटीएम पद्धती, टेपिंग पद्धती आणि मशीनद्वारे उपचार अशा आधुनिक तंत्रांचा वापर केला जाणार आहे.
सर्च हॉस्पिटलच्या मणका व सांधे विभागाने या सेवांचा अधिकाधिक लोकांनी लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे. आपल्या दैनंदिन जीवनातील शारीरिक अडचणींवर मात करून जीवन सुखकर बनवण्यासाठी ही संधी उपयुक्त ठरेल.
Comments are closed.