Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचा मोठा दावा;

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

सांगली : राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर ह्या  सांगली जिल्ह्याच्या  दौर्‍यावर आल्या असताना त्यांनी सांगलीतील पूर्वीच्या काळात माझ्याबरोबर काम केलेल्या अनेक महिला आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे सांगितले.

रूपाली चाकणकर सांगलीच्या दौर्‍यावर आल्या  त्यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर जिल्हा कार्यालयाला भेट दिली. तेथे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला असता  त्या म्हणाल्या,जिल्ह्याला वेगळी उत्सूकता आहे.  येत्या कालावधीमध्ये  राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षात मोठे प्रमाणात पक्ष प्रवेश होतील, असा विश्वास राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी व्यक्त केला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे, कार्याध्यक्ष जमील बागवान, महिला आघाडीच्या राधीका हारगे, जयंत जाधव आदी उपस्थित होते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

माजी मंत्री छगन भुजबळ यांना मंत्रीपद न मिळाल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रतिमेला जोडे मारले होते. या घटनेचा मी निषेध करते. भुजबळ यांच्या बाबतीत वरिष्ठ योग्य ते निर्णय घेतील, पण हे कृत्य चुकीचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. .राज्यात सोनोग्राफी सेंटरची संख्या वाढत आहे. अनेक ठिकाणी गैरप्रकार होत असल्याचे आढळून येत आहे. कोल्हापूर गर्भपात प्रकरणी कडक कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. सीमालगत भागात असे प्रकार होत आहेत. याला आळा घालण्यासाठी तपासणी मोहिम सुरू करण्याच्या सूचना अधिकार्‍यांना दिल्या असल्याचे त्यांनी सांगितले.

उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात अन्न आणि नागरी पुरवठा खातं सांभाळलेल्या भुजबळांना  मंत्रिपद नाकारण्यात आलेल आहे. त्यांच्याऐवजी नरहरी झिरवळ आणि माणिकराव कोकाटे या  दोघांना नाशिकमधून राष्ट्रवादीनं मंत्रिमंडळात स्थान दिलं आहे.  तसेच  कोकाटे यांच्या अभिनंदनासाठी लावण्यात आलेले बॅनर लक्षवेधी ठरत आहेत. दोघेही एकाच पक्षाचे असूनही कोकाटे यांच्यासाठी लावण्यात आलेल्या बॅनरवरुन भुजबळ यांचा फोटो गायब आहे. त्यामुळे हे बॅनर चर्चेचा विषय ठरत आहेत.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे आणखी वाचा,

मुल तहसील कचेरीवर धडकणार निळया वादळाचा आक्रोश

पोर्ला वनपरिक्षेत्रातील बेलगावच्या डोंगरावर हत्तींचा कळप स्थिरावला !

सहाव्या हप्ता केव्हा मिळणार ?. लाडक्या बहिणीं’ना प्रतीक्षा !

 

Comments are closed.