विधानसभा निवडणुकीच्या प्रचारतोफा थंडावल्या,
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
गडचिरोली : दिवाळी संपल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून जिल्ह्यात प्रचाराचे फटाके फुटण्यास सुरुवात झाली. बैठका, कॉर्नर सभा, रॅली, जाहीर सभांतून आरोप-प्रत्यारोप, एकमेकांवर वार, पलटवार यामुळे राजकीय वर्तुळ अक्षरशः ढवळून निघाले. १८ नोव्हेंबर रोजी दुपारी तीन वाजता प्रचार तोफा थांबल्या व प्रचारच्या भोंगेही उतरले. सोमवार दिवस उमेदवारांसाठी प्रचाराचा सुपर मंडे ठरला. सर्वच प्रमुख पक्ष व उमेदवारांनी शक्तिप्रदर्शन करण्यावर भर दिला. अहेरी, आरमोरी व गडचिरोलीतील पोस्टरही हटविले
महायुतीचे उमेदवार मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी सोमवारी सकाळी अहेरीतील विविध भागांत कॉर्नर सभा घेतल्या तसेच अहेरी येथे मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी रॅली काढून शक्तिप्रदर्शन केले. धर्मरावबाबा आत्राम सभेला येईपर्यंत महायुतीचे पदाधिकारी भाषण देत होते. धर्मरावबाबा आत्राम मतदारांशी संवाद साधून दुसऱ्या कॉर्नर बैठकीसाठी जात होते. त्यांनी दुपारी अहेरीत रॅली काढली, त्यानंतर आलापल्ली येथे रॅली काढून समारोप केला. यावेळी विरोधकांवर आरोप करत त्यांनी मतदारांना भावनिक आवाहन देखील केले.
अपक्ष उमेदवार अम्ब्रीशराव आत्राम यांनी दुपारी कार्यकर्त्याच्या बैठका घेतल्या. महाविकास आघाडीच्या उमेदवार भाग्यश्री आत्राम यांनी सिरोंचात रॅली काढून शक्तिप्रदर्शन केले तर अपक्ष उमेदवार अम्ब्रीशराव आत्राम यांनी दुपारी कार्यकर्त्याच्या बैठका घेतल्या.अपक्ष उमेदवार हनमंतु मडावी यांनीही पदयात्रा काढून लक्ष वेधले त्यानंतर त्यांच्या समर्थकांनी आलापल्लीत रॅली काढली. त्यांचा . शेवटच्या क्षणापर्यंत मतदारांना साद घालण्यावर भर होता. आरमोरीत महायुतीच्या रॅलीची सुरुवात घोषणाबाजीने झाली. यावेळी आमदार कृष्णा गजबे, सहकार नेते प्रकाश सा. पोरेड्डीवार व पदाधिकारी, कार्यकर्ते, गजबे, मसराम यांच्यात शक्तिप्रदर्शनाची चढाओढ महायुतीचे उमेदवार कृष्णा गजबे यांनी आरमोरी शहरातून रॅली काढून जनतेला आशीर्वाद मागितला. इंदिरा गांधी चौकातून रॅलीला सुरुवात झाली. गडचिरोली नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रकाश सा. पोरेड्डीवार यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले. रैली शहराच्या अंतर्गत प्रमुख मार्गासह राष्ट्रीय महामार्गाने फिरवून प्रचार कार्यालयात विसर्जित करण्यात आली. यावेळी गजबे यांनी मतदारांकडे आशीर्वाद मागितला.
महाविकास आघाडीचे उमेदवार रामदास मसराम यांची प्रचार रॅली भगतसिंग चौकातील कार्यालयातून सुरू झाली. या रॅलीत महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले. अधिकाधिक गर्दी जमविण्यासाठी दोन्हीकडून प्रथल दिसून आले. दोन्ही प्रमुख उमेदवारांनी जास्तीत जास्त गर्दी खेचण्याचा प्रयत्न केला. अपक्ष उमेदवारांनी मात्र कॉर्नर बैठका व भेटीगाठी घेत मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयल केला. महायुतीचे उमेदवार डॉ. मिलिंद नरोटे यांच्या प्रचारासाठी सिने अभिनेत्री सई ताम्हणकरच्या रोड शोतून महायुतीने लक्ष वेधले. आधी गडचिरोली शहरात व त्यानंतर व चामोर्शीतही रोड शो करुन दुपारी ३ वाजता समारोप केला. महायुती कडून माजी खासदार अशोक नेते, आमदार डॉ. देवराव होळी, माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी, महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा गीता हिंगे, प्रकाश गेडाम, रोशनी वरघंटे, आनंद भांडेकर, आशिष पिपरे उपस्थित होते.
महाविकास आघाडीचे उमेदवार मनोहर पोरेटी यांनीही गडचिरोली व चामोर्शी शहरात प्रचार रॅली काढली. रॅली करिता माजी नगराध्यक्ष सुरेश पोरेडीवार, प्रा. राजेश काव्रटवार, अरविंद कात्रटयार, हसनअली गिलानी, प्रभाकर वासेकर, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा अड. कविता मोहरकर, अॅड. राम मेश्राम, सतीश विधाते, रमेश चौधरी, नंदू कुमरे आदी उपस्थित होते. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार भरत येरमे यांनी गोकुलनगरातून रॅली काढली. प्रदेश सदस्य बाळू टेंभुर्णे, जी. के. बारसिंगे आदी सहभागी होते. मनोहर पोरेटी यांनी रॅली काढून चामोर्शी शहरात शक्तिप्रदर्शन केले.
प्रचाराची मुदत संपल्यानंतर उमेदवारांनी परवानगी घेऊन लावलेले बॅनर, पोस्टर प्रशासनाने उतरवून घेतले. एटापल्ली शहरात नगर पंचायत विभागाच्या वतीने स्वच्छता कर्मचायांनी शहरभर लावलेले राजकीय पक्षाचे पोस्टर्स ट्रॅक्टरमधून गोळा केले. जिल्ह्यात एकही बॅनर, पोस्टर्स राहता कामा नये, असे काही आढळल्यास आचारसंहिता भंगाचा गुन्हा नोंदविण्यात येईल, असा इशारा निवडणूक विभागाने दिलेला आहे. जिल्ह्यातील तिन्ही मतदारसंघात जातीय समीकरणे, स्वतःची बलस्थाने, विरोधकांचे कच्चे दुवे या बाबी हेरुन सभा, रैली काढून वातावरण निर्मितीचा प्रयत्न झाला.
Comments are closed.