Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

चालले होते लग्नाला आणि पोहोचले पोलीस ठाण्यात

Get real time updates directly on you device, subscribe now.

  • मास्क न घातलेल्या परिधान कारवाईत पालिका कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करणारे दांपत्य गजाआड 
  • पालिका कर्मचारी आणि पोलिसांच्या सोबत हुज्जत घालणे पडले महागात विडिओ वायरल

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

कल्याण, दि. २७ फेब्रुवारी: कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या प्रभाग क्षेत्र 4 ची विना मास्क परिधान करणाऱ्यांवर चक्की नाका येथे कारवाई सुरू होती. या कारवाईत स्कूटी वरून आलेल्या दोन जणांनी मास्क परिधान केला नव्हता, त्यांना पालिका कर्मचाऱ्यांकडून दंडात्मक कारवाई करण्यात आली, सुरुवातीला दंड भरण्यास नकार दिला,  नंतर थेट या दोघांनी पालिका कर्मचारी राजेंद्र खैरे, राम सावंत, अमीर भालेराव, ज्ञानेश्वर ठाकरे, सुरज गायकवाड यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली, लग्नासाठी चाललेले हे दोघेजन आता कोळसेवाडी पोलीस ठाण्यात पोहचले आहेत.

पोलीस प्रशासन आणि पलिका कर्मचारी यांच्याकडून वेळोवेळी समजावून देखील त्यांनी तोंडाला मास्क लावला नाही उलट अरेरावी करत, शिवीगाळ केल्याप्रकरणी, दोघांवरही सरकारी कामात अडथळा, धमकी, साथीचा रोग अन्वये गुन्हा दाखल झाला असून दोघांची नावे अमृता सोनावणे, आणि अमित पारेकर आहे. या दोघांना उद्या कल्याण कोर्टात हजर करण्यात येणार आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.