Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

मालवाहू ट्रकच्या धडकेने सायकलस्वार जागीच झाला ठार

चामोर्शीतील येथील घटना:

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

गडचिरोली :  चामोर्शी येथील आष्टी कार्नर व जुने लक्ष्मी गेट एसबीआय बँकजवळ आष्टीकडून येणाऱ्या मालवाहू ट्रकमध्ये सापडून  हनुमान नगरातील वयस्क नागरिकाचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडली. घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी केली होती.

मलेश भिमन्ना कनकुटलावार (६५) रा. चामोर्शी असे मृतकाचे नाव आहे. मलेश हे गांधी यांच्या राइस मिलमध्ये चौकीदार म्हणून कामावर होते. ते आपल्या सायकलने सकाळी ११ वाजताच्या सुमारास मिलकडे जात असताना आष्टीकडून येणाऱ्या सीजी ०७-सी आर ७२९९ ट्रने धडक दिली. यात ते ट्रकमध्ये सापडल्याने त्या वृद्धाचा जागीच मृत्यू झाला. सदर ट्रक ड्रायव्हर छत्तीसगड येथील असून  ट्रक ड्रायव्हर भीतीने घटना स्थळावरून फरार झाला.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

शहरात वाहतूककोंडी नेहमी होत असते. भविष्यात अशा घटना होऊ नये यासाठी .आष्टी कार्नर ते  जुने लक्ष्मी गेट चौकात ब्रेकरची, बॅरिकेट्स व कायमस्वरूपी वाहतूक पोलिसाची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी नागरिकांनी व मृतकाचा पुतण्या सुभाष कनकुटलावार यांनी केली आहे.

 

Comments are closed.