Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गडचिरोलीतील मागासलेपणा दूर करून नक्षलग्रस्त ही ओळख पुसायची आहे – पालकमंत्री एकनाथ शिंदे

- कुरखेडा - कोरची नगरपंचायत पदाधिकारी आढावा बैठकीत पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले प्रतिपादन.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

गडचिरोली, दि. ४ डिसेंबर : गडचिरोली जिल्ह्यातील नगर पंचायतच्या निवडणुका अवघ्या काही दिवसांवर असल्याने शिवसेनेमार्फत कुरखेडा येथे कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला राज्याचे नगर विकास व सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदेसह गडचिरोली जिल्हा समन्वयक किरण पांडव, आरमोरी विधानसभा प्रमुख सुरेंद्रसिह चंदेल, अरविंद कात्रटवार, छायाताई कुंभारे व आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

एकनाथ शिंदे यांनी आयोजित पदाधिकारी मेळाव्यात उमेदवारांची नावे जाहीर केली व एकजुटीने लढायचे असल्याचे स्पष्ट केले. ते म्हणाले की, नगर विकास विभाग आपल्याकडे असल्याने घरकुल, कांक्रेटचे रस्ते, नाल्या, पाणी पुरवठा, सौंदर्यकरण, शेतकऱ्यांना वीज जोडणी हि सर्व गावकऱ्यांची विकासात्मक कामे करून मागासलेपणा दूर करून नक्षलग्रस्त हि ओळख पुसायची आहे. गडचिरोली जिल्ह्याला निसर्गाच मोठ वरदान लाभलेल आहे. त्यामुळे जिल्ह्याचा विकास तसेच रोजगाराबाबत मुख्यमंत्री तसेच सर्व मंत्रीही जिल्हा विकासासाठी कटिबद्ध आहेत.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

जिल्ह्यात दुर्गम भागातील वैद्यकीय सेवा करण्यासाठी शिबिरे लावून योग्य उपचारासाठी नागरिकांना मुंबईत पाठवून चांगला उपचार करण्यात येईल. सध्या जिल्ह्यात रस्त्याचे जाळे विणण्याचे कामे सुरु आहे. नागपूर, गोंदिया, भंडारापासून गडचिरोली पर्यंत समृद्धी महामार्ग पोहोचविण्यासाठी प्रयत्न केले आहे. आणि प्रयत्न होत राहणार त्यामुळे निवडणूकीत महाविकास आघाडी सोबत राहणार असल्याने सर्वांनी एकजुटीने काम करण्याची गरज आहे. याशिवाय १७५ कोटी रुपयांचा टीसीएस कंपनीचा प्रकल्प आणून रोजगार उपलब्ध करून देणार. असे मंत्री एकनाथ शिंदे यांनी आयोजित मेळाव्यात प्रतिपादन केले.

हे देखील वाचा :

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

बिबट्याच्या हल्ल्यात सहायक पोलीस उपनिरीक्षकाचा मृत्यू

प्रेमी युगलांनी झाडाला गळफास घेत केली आत्महत्या!

 

 

Comments are closed.