Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गोंडवाना विद्यापीठाला शिक्षण संचालक उच्च शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे यांनी प्रशस्तीपत्र देऊन केले सन्मानित

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोली, दि. ४ डिसेंबर : गोंडवाना विद्यापीठाला माहिती व्यवस्थापन प्रणाली (MIS) साठी घेतलेल्या परिश्रमा बद्दल शिक्षण संचालक उच्च शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे यांनी प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित केले. सदर प्रशस्तीपत्र महाराष्ट्रातील फक्त तीन विद्यापीठांना देण्यात आले आहे. त्यात गोंडवाना विद्यापीठाचा समावेश आहे.

गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली आणि अधिपत्याखालील सर्व संलग्नित महाविद्यालयांना ही माहिती व्यवस्थापन प्रणाली (MIS) सन २०२०-२१ याबाबतची शैक्षणिक व प्रशासकीय विविध बाबींची १००% माहिती वेबपोर्टलवर भरून शासनाला सादर केली आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

सदर माहिती शासनाला विविध शैक्षणिक बाबींच्या संदर्भात निर्णय घेण्याकरिता अत्यंत आवश्यक व उपयुक्त आहे. माहिती संकलना करिता गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली आणि विद्यापीठ नोडल अधिकारी यांनी केलेले प्रयत्न तसेच घेतलेले परिश्रम यामुळेच गोंडवाना विद्यापीठ कौतुकास पात्र आहे. कोरोना प्रादुर्भावाच्या काळातही गोंडवाना विद्यापीठाने आदिवासी दुर्गम भागात नेटवर्क कनेक्टिविटी नसतानाही ऑनलाइन परीक्षा सुरळीत पार पाडल्या, त्यासाठी महामहिम राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनीही विद्यापिठाला अभिनंदन पत्र पाठवून कौतुक केले होते.

विद्यापीठाला राज्य शासनाचा सर्वोत्कृष्ट विद्यापीठ पुरस्कार आणि त्यानंतर आता शिक्षण संचालक  (उच्च शिक्षण) महाराष्ट्र राज्य पुणे यांनी गोंडवाना विद्यापीठाला प्रशस्तिपत्र देऊन सन्मानित केले. त्यामुळे विद्यापीठाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. श्रीनिवास वरखेडी यांच्या मार्गदर्शनात विद्यापीठाची यशस्वी घोडदौड सुरू आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा :

बिबट्याच्या हल्ल्यात सहायक पोलीस उपनिरीक्षकाचा मृत्यू

प्रेमी युगलांनी झाडाला गळफास घेत केली आत्महत्या!

 

शिक्षकाने सातव्या वर्गातील विद्यार्थीनीचा केला विनयभंग!

 

 

 

Comments are closed.