Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

बिबट्याच्या हल्ल्यात सहायक पोलीस उपनिरीक्षकाचा मृत्यू

चंद्रपूर-बल्लारपूर मार्गावर बॉटनिकल गार्डन वळणावरील घटना.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

चंद्रपूर, दि. ४ डिसेंबर : चंद्रपूर-बल्लारपूर मार्गावर बॉटनिकल गार्डन वळणावर दुचाकीसमोर बिबट्या आल्याने सहायक पोलीस उपनिरीक्षकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

मृतक सहायक पोलीस उपनिरीक्षकाचे नाव अविनाश पडोळे (५०) असे असून चंद्रपूर येथील पोलीस अधिक्षक कार्यालयात बिनतारी संदेश वहन विभागात कार्यरत होते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

प्राप्त माहितीनुसार अविनाश पडोळे आपल्या पॅशन मोटर सायकल क्रं. एमएच ३४ एटी २०५७ ने स्वार होऊन आज दि. ४ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजताच्या सुमारास चंद्रपूरहून बल्लारपूरकडे निघाले होते. दरम्यान बॉटनिकल गार्डन वळणावरील बल्लारपूर शहराच्या प्रवेशद्वार जवळ पावर हाऊस शेजारी झुडपात दबा धरून बसलेल्या बिबट्याने अविनाश पडोळे यांच्यावर हल्ला चढविला. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे पडोळे हे दुचाकीसह रस्त्यावर खाली पडले. त्यामुळे त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. हल्ला केल्यानंतर बिबट्या लगेच घटनास्थळावरून पळून गेला.

घटनेनंतर मागून येत असलेल्या स्थानिक बीटीएस प्लांट निवासी राकेश यादव व दिपेश यादव यांनी तातडीने जखमी सहायक पोलीस उपनिरीक्ष यांना बल्लारपूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. परंतु, त्यांना गंभीर दुखापत झाली असल्याने अविनाश पडोळे यांची आरोग्य अधिकारी डॉ. गजानन मेश्राम यांनी प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

या घटनेमुळे या मार्गावरून ये-जा करणा-या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

 

हे देखील वाचा : 

प्रेमी युगलांनी झाडाला गळफास घेत केली आत्महत्या!

कौटुंबिक न्यायालय परिसरात पतीने पाडला पत्नीचा दात

शिक्षकाने सातव्या वर्गातील विद्यार्थीनीचा केला विनयभंग!

 

 

Comments are closed.