सूर्जागड लोहखनिज प्रकल्पावरून मंत्री,धर्मरावबाबा आत्राम यांना पुनः पुन्हा एकदा नक्षल्यांनी गट्टा परिसरात पत्रक टाकुन केला प्रखर विरोध..
लोकस्पर्श न्यूज़ नेटवर्क,
गडचिरोली, 20 सप्टेंबर : गडचिरोली जिल्ह्यातील सूरजागड येथे सुरू असलेल्या लोह प्रकल्पावरून मंत्री, धर्मराव बाबा आत्राम यांना यापूर्वीही नक्षल्यानी पत्रकाद्वारे लक्ष करीत विरोध केला होता. त्याचे पडसाद ही हिवाळी अधिवेशनात प्रखरतेने दिसून आले होते . त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी आत्राम यांची सुरक्षा वाढविण्याचे आश्वासन ही दिले होते.परंतु उलट सुरक्षा कमी केल्याचे कळते. त्यामुळे मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांचा सुरक्षेचा प्रश्न एरणीवर असताना त्यांनतर राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांना पुन्हा एकदा नक्षल्यांनी गट्टा परिसरात पत्रक टाकुन यात धर्मरावबाबा, चे जावई आणि काही लोह प्रकल्प समर्थक असलेल्यां लोकांना धमकी पत्रकात लिहिले असल्याने पुन्हा एकदा एकच खळबळ उडाली आहे.
एटापल्ली तालुक्यातील बहुचर्चित असलेला सुरजागड लोह प्रकल्प कुठल्या ना कुठल्या कारणाने चर्चिला जात असतो. मागील दोन वर्षांपासून सूरजागड लोहप्रकल्पात लोह खनिजांचे उत्खनन सुरू असून नक्षल्यांचा लोह प्रकल्पाला विरोध आहे. अशातच प्रकल्प सुरू आल्याने राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम जबाबदार असून त्यांना किंमत चुकवावी लागेल, अशाप्रकारची धमकी देणारे पत्र गट्टा परिसरात आढळून आले.
हे पत्रक पश्चिम सब झोनल ब्युरो श्रीनिवास यांच्या नावे असून यात आत्राम यांचे जावई, त्यांचे भाऊ व कंपनीत कार्यरत समर्थक असलेल्या काही लोकांची देखील नावे आहेत.धर्मराव बाबा आत्राम यांना वर्षभरात तिसऱ्यांदा नक्षल्यांनी धमकी दिली असून सद्यस्थितीत सुरक्षेसाठी ‘झेड’ दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे.
Comments are closed.