Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

झेंडेपारमधील प्रस्तावित खाणींला आदिवासींमध्ये प्रखर विरोध दर्शविला

राव पाट गंगाराम' यात्रेत ९०ग्रामसभांचा विरोधी सूर

लोकस्पर्श न्युज नेटवर्क

कोरची 6 फेब्रुवारी :- दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा झेंडेपार ग्रामसभेतील खनिमटा रावघाट गंगाराम घाट जत्रा व 90 ग्रामसभांचे वार्षिकत्सव व अधिकार संम्मेलन मोठ्या उत्साहात पार पडले. आम्ही आदिवासी व इतर पारंपारिक वननिवासी निसर्ग पुनक असून पारंपारिक शिव्या निसर्गातील संसाधनांचे जतन करीत आहोत. आमची श्रद्धा-विश्वास के निसर्गाशी जुडलेले असुन आमचे जीवन त्यावर आधारीत आहे. पिढ्यानपिढ्या आमचे पुर्वन या निसर्गाचे संरक्षण करीत आलेत, म्हणुनच आज आदिवासी बहुल क्षेत्रात जल-जंगल-जमिन ही संसाधने टिकुन आहेत. या निसर्गाशी आमची उपनिवीकाच नाही तर आमची संस्कृती, आमचे देव (पेन) यात वसलेले आहेत आणि त्यांचे रक्षण करणे हे आम्ही आपले कर्तव्य समजतो.

आमचे देव रावघाट गंगाराम घाट हे स्वनिमय झेंडेपार या ठिकाणी असून 152 वर्षापासुन या देवाची आम्ही पुजा करीत आहेत. दरवर्षी कुमकोट व पडियालनोब ईलाख्यातील ग्रामसभा मिळुन झेंडेपार येथील कार्यक्रम आदिवासी मुलनिवासी संस्कृती, प्रथा-परंपरा यांचे जतन-संवर्धन तसेच रक्षण करण्याकरीता आयोजित केले जाते. काही लोक विकासाच्या नावाने आदिवासी संसाधने, देव, संस्कृती नष्ट करायला बघत आहेत, त्यासाठी आपण आदिवासी व इतर पारंपारिक वननिवासी बांधवांना आवाहन आहे की, त्यांनी जागरुक नागरिक बनुन आपल्या अधिकारांप्रती नागरुक व्हावे. यावेळी पंचायत संबंधी उपबंध (अनुसुचित क्षेत्रात विस्तार) अधिनियम 1996 (पेसा) तसेच अनुसुचित जमाती व इतर पारंपारिक वननिवासी (वनहक्कांची मान्यता) कायदा 2006, नियम 2008 व सुधारणा 2012 (वनहक्क कायदा) अंतर्गत अधिकारांची जाणीव होऊन गाव-ग्रामसभा सक्षम व्हावेत याकरीता दोन दिवसिय वार्षिकोत्सव (चर्चा) चे आयोजन करण्यात आलेले होते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

सूरजागडमध्ये स्थानिकांचा विरोध डावलून, ‘पेसा’ सारखे कायदे पायदळी तुडवून बळजबरीने खाण सुरू करण्यात आली. आज तो परिसर आणि त्याभागातील जंगल उद्धवस्त होण्याच्या मार्गावर आहे. रोजगार आणि विकास केवळ कागदावर आहे. ती परिस्थिती आमच्या भागात नको. म्हणून आमचा विरोध आहे. विकास करायचा असेल तर आधी येथील पायाभूत सुविधा सुधारा.

– समारु कल्लो, महाग्रामसभा सदस्य, कोरची.

तालुक्यातील झेंडेपार टेकडीवर लोहखाण सुरू करतील या भीतीने तेथील आदिवासींमध्ये भीती व्यक्त केली. शुक्रवारी पार पडलेल्या राव पाट गंगाराम यात्रेत ९० ग्रामसभांनी यावर चिंता व्यक्त करीत कडाडून विरोध दर्शवला आहे. गडचिरोली जिल्ह्यात एकूण २५ खाणी प्रस्तावित आहे. सूरजागडनंतर आता उर्वरित खाणी सुरू करण्याबाबत काही कंपन्या उत्सुक असून त्यांनी त्यादृष्टीने चाचपणी सुरू केली आहे. यामुळे जिल्ह्यातील कोरची तालुक्यातील आदिवासींमध्ये अस्वस्थता पाहायला मिळत आहे. येथील झेंडेपार गावनजिक असलेल्या टेकडीवर लोहखनिजाचे साठे आहेत. २०१७ मध्ये एका कंपनीला येथे उत्खननाचे कंत्राट देण्यात आले होते. मात्र, स्थानिकांच्या विरोधामुळे उत्खनन सुरू होऊ शकले नाही. परंतु सूरजागडच्या प्रयोगानंतर आता सुद्धा टप्प्याटप्प्याने उत्खनन सुरू करेल, अशी भीती येथील आदिवासींना आहे. या टेकडीवर आदिवासींचे श्रद्धास्थान असलेल्या ‘राव गंगाराम पाट’ यात्रेत ही खदखद बाहेर आली. यावेळी तालुक्यातील २ इलख्यातून आलेल्या प्रशासनाला विकासच करायचा असेल तर आधी याभागात शाळा, रस्ते, आरोग्य सुविधा आदी विकसित करा अशी  ९० ग्रामसभांच्या प्रतिनिधींनी एक बैठक घेत खाणविरोधी भूमिका मांडली.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

प्रशासन झेंडेपारमध्येकराव्या, गौण वन उपाजावर आधारित प्रक्रिया उद्योग उभारावे. पण खाणी सुरू करून परिसर उध्वस्त करू नये, अशी मागणी ग्रामसभांनी केली आहे. बैठकीला दलित आदिवासी आर्थिक आर्थिक प्रश्नांचे अभ्यासक प्रा. डॉ. गौतम कांबळे, कष्टकरी जनआंदोलनाचे नेते विलास भोंगाडे, प्रसिद्ध कवी प्रभू राजगडकर, माजी जिप सदस्य अनिल केरामी , राजराम नैताम महाग्रामसभा अध्यक्ष, बुकवू होळी, गोंबनसिंग होळी ग्रामसभा सदस्य भरीटोला, डॉ, सतीश गोगुलवार , सरील मडावी सरपंचसह नादळी हे प्रामुख्याने ग्रामसभांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

हे पण वाचा :-

 

Comments are closed.