Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

आरमोरी तालुक्यात बनावट सुगंधित तंबाखूचा व्यापार फोफावला

  • आरमोरी,वैरागड पिसेवडधा ही ठोक व्यावसायिक ची प्रमुख केंद्र
  • विक्रीतून होतो दररोज लाखो रुपयांची उलाढाल.
  • अन्न व औषध प्रशासन आणि पोलीस विभाग निद्रावस्थेत.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

आरमोरी दि.०७ जानेवारी :- आरमोरी तालुक्यात बनावट सुगंधित तंबाखू विक्रीचा काळाबाजार दिवसेंदिवस मोठय़ा प्रमाणात फोफावत चालला असून दररोज या व्यवसायात लाखो रुपयांची उलाढाल सुरू आहे. आरमोरी, वैरागड, पिसेवडधा, ही बनावट सुगंधित तंबाखू निर्मितीची प्रमुख केंद्र व ठोक व्यावसायिकाचे माहेरघर बनले आहे. बनावट सुगंधित तंबाखू तयार करून खुलेआम दिवसा ढवळ्या विकलं जातं आहे. मात्र अन्न व औषध प्रशासन व पोलीस विभागाच्या अधिकार्‍यांकडून या व्यवसायाला खतपाणी मिळत असल्याने या धंद्यातील ठोक व्यावसायिकांंना सुगीचे दिवस आले असल्याची स्थानिक नागरिकात चर्चा आहेत .

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

बनावट सुगंधित तंबाखूची निर्मिती व उत्पादन करून त्याची गावागावात बिनबोभाट विक्री सुरू असतानाही त्यावर सबंधित विभागातील कुणाचेही नियंत्रण नाही. त्यामुळे हा व्यवसाय मोठ्या प्रमाणात फोफावला आहे.

राज्य शासनाने सुगंधित तंबाखू घुटका विक्रीवर बंदी घालणारा कठोर कायदा केला असला तरी सुद्धा त्याची अमलबजावणी करणारी व त्यावर नियंत्रण ठेवणारी यंत्रणा पांगळी असल्यामुळे हा कायदा केवळ कागदावर आहे की काय? अशी शंका निर्माण झाली आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

आरमोरी तालुक्यात बनावट सुगंधित तंबाखू तयार करून त्याची विक्री करणार्‍या व्यावसायिकाची पाळेमुळे खोलवर रुजली आहेत. सध्या तंबाखूवर केमिकल द्वारे, प्रक्रिया करून व मशीन द्वारे पॅकिंग करून बनावट सुगंधित तंबाखू तयार केला जातो. तयार केलेला बनावट सुगंधित तंबाखू शहरात व तालुक्यातील ग्रामीण भागात दररोज वाहनाद्वारे विकला जात आहे . आरमोरी शहरातील बर्डी येथील एक ठोक व ईतर लहान व्यावसायिक तसेच वैरागड येथील एक मोठा किराणा व्यावसायिकाणे या धंद्यात मोठा जम बसविला आहे. तर पिसेवडधा येथील एक व्यावसायिक ही गेल्या अनेक वर्षांपासून या धंद्यात आहे. तयार केलेला बनावट सुगंधित तंबाखू हा आरमोरी तालुक्यासह जिल्ह्यातील ईतर भागात तसेच ईतर राज्यात सुद्धा विक्रीसाठी नेला जातो .त्यामुळे या व्यावसायिकाने नेटवर्क खुप लांब दुरपर्यंत पोहोचले असल्याची माहिती आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हा धंदा जणू काही परवाना असल्या सारखाच खुलेआम सुरू असताना त्यावर कुणाचेही नियंत्रण नाही असे म्हणण्या पेक्षा हेतुपुरस्पर दुर्लक्ष केल्या जात आहे. बनावट सुगंधित तंबाखू तयार करून विक्री करणारे व्यावसायिक व दुकानदार कोण आहेत याची संपूर्ण माहिती अन्न व औषध प्रशासन व पोलीस विभागाला आहे. मात्र ” चलता है तो चलणे दो, “ या भूमिकेमुळे हा व्यवसाय मोठ्या प्रमाणात फोफावला आहे.

बनावट सुगंधित तंबाखू निर्मिती चे कारखाना सुरू असताना यांची माहिती अन्न व औषध प्रशासन विभाग व पोलीस विभागाच्या अधिकाऱ्यांन माहिती नाही का? की हेतुपुरस्सर याकडे दुर्लक्ष केले जाते हे कळायला मार्ग नाही. मागील मार्च महिन्यात वैरागड येथील ठोक व्यावसायिकाचे आरमोरी येथे सुगंधित तंबाखू चे गोदाम सापडून जवळपास 30 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. मात्र तीन तीन महिने नमुने तपासणी चा रिपोर्ट प्रयोग शाळेतून येत नाही . त्यामुळे हजारो लोकांच्या जिवाशी खेळ खेळणाऱ्या त्या व्यावसायिकावर कठोर कारवाई न करता थातूरमातूर कारवाई केली जाते. परिणाम कारक कारवाई होत नसल्याने ठोक व्यावसायिक यांच्यावर काहीच परिणाम होताना दिसत नाही याशिवाय स्विट मार्ट व किराणा दुकानाचा आधार घेऊन ठोक व्यावसायिक व ईतर विक्रेते हा बनावट सुगंधित तंबाखू विक्रीचा काळाबाजार करीत आहेत. तंबाखू विक्रीचा खुला परवाना असल्या प्रमाणे दररोज लाखो रुपयांचा बनावट सुगंधित तंबाखू विकला जातो आहे.

तालुक्यात बनावट सुगंधित तंबाखू निर्मितीचे छुपे गोदाम असून याच गोदामात कारागीर व मशनरीद्वारे बनावट सुगंधित तंबाखू तयार करण्याचा गोरख धंदा सुरू आहे. मात्र अन्न व औषध प्रशासन विभाग व पोलीस विभागाच्या अप्रत्यक्ष सहकार्य व दुर्लक्षित पनामुळे हा व्यवसाय तेजीत सुरू असून या व्यवसायाला सुगीचे दिवस आले आहेत.

आरमोरी, वैरागड, पिसेवडधा येथील ठोक तंबाखू व्यावसायिक नागपूर व नजीकच्या छत्तीसगड राज्यातून इगल व साधा तंबाखू आणून आपल्या गोडाऊन मध्ये केमिकल चा वापर करून भेसळयुक्त बनावट सुगंधित तंबाखू तयार करीत आहेत. व तयार करण्यात आलेला तंबाखू छुप्या पद्धतीने दिवसाढवळ्या वाहनाने जिल्ह्याचा अनेक भागात विकला जात आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हा व्यवसाय खुलेआम सुरू असल्याने हे व्यावसायिक मालामाल झाले आहे. मात्र शेकडो हजारो लोकांच्या शरीरात विष पेरणार्‍या त्या ठोक विक्रेत्या वर कारवाई साठी अन्न व औषध प्रशासन व पोलीस विभाग पुढे येणार काय ? असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत.

सदर प्रकरणावर आरमोरीचे पोलीस निरीक्षक दिगंबर सूर्यवंशी यांच्याशी बातचीत केली असता त्यांनी “या प्रकरणाची माहिती मिळाली असून चौकशी सुरु आहे” अशी प्रतिक्रिया दिली.

Comments are closed.