Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

तीन जहाल माओवाद्यांनी केले गडचिरोली पोलीस व सिआरपीएफ समोर आत्मसमर्पण..

शासनाने जाहिर केले होते एकुण 38 लाख रूपयांचे बक्षिस

Get real time updates directly on you device, subscribe now.

एक सिवायपीसी, एक डिव्हीसीएम व एक एसीएम,पीपीसीएम दर्जाच्या वरीष्ठ कॅडर पदावरील माओवाद्यांच दंपत्यासह आत्मसमर्पण..

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोली: नक्षल सप्ताह दरम्यान जहाल महिला माओवाद्याने गडचिरोली पोलीस व सीआरपीएफ दलासमोर आत्मसमर्पण केलं. या महिला नक्षलवाद्यावर शासनाने ३८ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. अशातच आज 01 सिवायपीसी/डी.व्हि.सी.एम., 01 डि.व्हि.सी.एम. व 01ए.सी.एम.,पी.पी.सी.एम. दर्जाचे वरिष्ठ माओवादी असे एकुण तीन जन गडचिरोली पोलीस व सीआरपीएफ च्या जवानासमोर आत्मसमर्पण केले आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

यामध्ये जहाल माओवादी 1) विक्रम ऊर्फ मंगलसिंग ऊर्फ संदिप सहागु तुलावी, (सिवायपीसी/डिव्हीसीएम/उप-कमांडर, कंपनी क्र. 10), वय 40 वर्षे रा. गुर्रेकसा, ता. धानोरा, जि. गडचिरोली, 2) नीलाबाई ऊर्फ अनुसया बंडु ऊईके, (डिव्हिसीएम, कुतुल दलम, माड डिव्हीजन), वय 55 वर्षे, रा. मेडपल्ली, ता. भामरागड, जि. गडचिरोली व 3) वसंती ऊर्फ सुरेखा ऊर्फ दुल्लो राजु हिडामी, (पि.पी.सी.एम./सी-सेक्शन कमांडर, कंपनी क्र. 10), वय 36 वर्षे, रा. गुर्रेकसा, ता. धानोरा, जि. गडचिरोली यांचा समावेश असून गडचिरोली पोलीस व सिआरपीएफ समोर आत्मसमर्पण केले आहे.

विक्रम ऊर्फ मंगलसिंग ऊर्फ संदिप सहागु तुलावी 2004 मध्ये टिपागड दलममध्ये सदस्य पदावर भरती होऊन सन 2005 पर्यंत काम केले. 2012 मध्ये डीके झोन डॉक्टर टिममध्ये कमांडर पदावर काम केले.2022 पासून आतापर्यंत, कंपनी क्र. 10 मध्ये सीवायपीसी/डिव्हिसीएम/उप-कमांडर पदावर काम केले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

नीलाबाई ऊर्फ अनुसया बंडु ऊईके डिसेंबर 1988 मध्ये भामरागड दलममध्ये सदस्य पदावर भरती होवून सन 1991 पर्यंत काम केले.जानेवारी 2025 पासून कुतूल एरीया कमिटीतील टेलर टिममध्ये बदली होऊन डिव्हिसीएम पदावर आजपावेतो काम केले.

वसंती ऊर्फ सुरेखा ऊर्फ दुल्लो राजु हिडामी, 2008 मध्ये मौजा गुर्रेकसा गावातील केएएमएस (क्रांतीकारी आदिवासी महिला संघटन) मध्ये सदस्य पदावर भरती होऊन सन 2009 पर्यंत काम केले.ऑक्टोंबर 2024 मध्ये कंपनी क्र. 10 पीपीसीएम (प्लाटुन पार्टी कमिटी मेंबर) पदावर पदोन्नती होऊन सी-सेक्शन उपकमांडर म्हणून आजपावेतो काम केले.

 आत्मसमर्पीत होण्याची कारणे
गडचिरोली पोलीसांच्या सततच्या गस्तीमुळे जंगलात फिरणे कठिण झाले होते. नक्षल दलममध्ये अहोरात्र भटकंतीचे जीवन असल्यामुळे स्वत:च्या आरोग्याविषयी समस्या उद्भवल्यास त्याकडे काळजीपुर्वक लक्ष दिल्या जात नाही. चकमकीदरम्यान पुरुष माओवादी पळून जाण्यात यशस्वी होतात, मात्र महिला यात ठार मारल्या जातात.खबरी असल्याच्या फक्त संशयावरून आमच्याच बांधवांना ठार मारायला सांगतात. माओवादी दलममधील जेष्ठ माओवाद्यांकडुन स्त्रीयांना भेदभावजनक वागणूक दिली जाते.दलममधील वरिष्ठ कॅडरचे माओवादी सांगतात की, चळवळीकरीता/जनतेकरीता पैसे गोळा करावे. प्रत्यक्षात गोळा केलेला पैसा ते स्वत:साठीच वापरतात. जनतेच्या विकासासाठी हा पैसा कधीच वापरल्या जात नाही.वरिष्ठ माओवादी नेते फक्त स्वत:च्या फायद्यासाठी गरीब आदिवासी युवक-युवतींचा वापर करून घेतात.
शासनाने जाहिर केलेले बक्षीस.
  • महाराष्ट्र शासनाने विक्रम ऊर्फ मंगलसिंग ऊर्फ संदिप सहागु तुलावी याच्यावर 16 लाख रूपयाचे बक्षीस जाहिर केले होते.
  • महाराष्ट्र शासनाने नीलाबाई ऊर्फ अनुसया बंडु ऊईके हिच्यावर 16 लाख रूपयाचे बक्षीस जाहिर केले होते.
  • महाराष्ट्र शासनाने वसंती ऊर्फ सुरेखा ऊर्फ दुल्लो राजु हिडामी हिच्यावर 06 लाख रूपयाचे बक्षीस जाहिर केले होते.

    गडचिरोली पोलीस दलाने अतिशय प्रभावीपणे माओवादविरोधी अभियान राबविल्यामुळे तसेच शासनाने माओवाद्यांना आत्मसमर्पणाची सुवर्णसंधी उपलब्ध करून दिल्याने, सन्मानाने जीवन जगण्यासाठी सन 2022 ते आतापर्यंत एकुण 53 जहाल माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. तसेच सन 2025 साली आतापर्यंत एकुण 20 माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले.
    सदर माओवाद्यांचे आत्मसमर्पण घडवून मुख्यप्रवाहात आणण्याबाबतची कारवाई संदिप पाटील, विशेष पोलीस महानिरीक्षक (नक्षलविरोधी अभियान) नागपूर, अंकित गोयल, पोलीस उप-महानिरीक्षक, गडचिरोली परिक्षेत्र,अजय कुमार शर्मा, पोलीस उप-महानिरीक्षक (अभियान) सीआरपीएफ, नीलोत्पल, पोलीस अधीक्षक गडचिरोली व सत्य प्रकाश, कमांण्डट 191 बटा. सिआरपीएफ यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडली.
    यावेळी पोलीस अधीक्षक गडचिरोली नीलोत्पल यांनी आवाहन केले की, विकासकामांना आडकाठी निर्माण करणा­या माओवाद्यांवर पोलीस दल सक्षमपणे कारवाई करण्यास तत्पर असुन, जे माओवादी विकासाच्या प्रवाहात सामील होण्यास ईच्छुक असतील त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तसेच लोकशाहीतील सन्मानाचे जीवन जगण्यासाठी गडचिरोली पोलीस दल सर्वतोपरी मदत करेल, तसेच त्यांनी हिंसेचा त्याग करुन शांततेचा मार्ग स्वीकारावा असे आवाहन गडचिरोली पोलिसांनी केले आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.