Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

आज संत गजानन महाराजांची पुण्यतिथी, लाखो भाविक शेगावात दाखल

संत नगरीला मोठे जत्रेचे स्वरूप

लोकस्पर्श न्यूज़ नेटवर्क,

बुलढाणा,20 सप्टेंबर : बुलढाणा जिल्ह्यातील विदर्भाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या शेगांवच्या संत श्री गजानन महाराजांची आज 113 वी पुण्यतिथी आहे. यानिमित्याने मोठ्या संख्येने भाविक शेगांव येथे दाखल झालेले आहेत. भाविकांनी शेगांव येथे महाराजांच्या दर्शनासाठी गर्दी केली आहे. गजानन महाराजांनी आठ सप्टेंबर 1910 रोजी ऋषीपंचमीच्या दिवशी समाधी घेतली होती. त्यामुळे हा दिवस श्री संत गजानन महाराजांचा पुण्यतिथी उत्सव म्हणून साजरा केला जातो.

सोहळ्यासाठी महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून आणि विशेषता ग्रामीण भागातून हजारो भजनी दिंड्यासुद्धा सहभागी झाल्या आहेत. शेगावात शेकडोंच्या संख्येने दिंड्या दाखल झाल्या असून पुण्यतिथी उत्सवानिमित्त श्रींची पालखी अश्व ,रथ, मेनादिंडी आदि वैभवासह सपूर्ण गावात नगर परिक्रमा करणार आहे. यावेळी टाळ मृदुंगाच्या निनादात हरी नामाच्या गजराने शहरातील वातावरण अगदी भक्तिमय होऊन जाते. श्री संत गजानन महाराज संस्थान तर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या वर्षभरातील उत्सवापैकी हा देखील एक मोठा उत्सव असतो.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.