Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत पारंपारिक वेशभूषा कार्यक्रम

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोली 4 ऑगस्ट :- 

भारतीय स्वातंत्रयाला 75 वर्ष पूर्ण होत असल्याचा पार्श्वभूमीवर,देशात सर्वत्र “आजादी का अमृत महोत्स्व” या उपक्रमांर्तगत विविध कार्यक्रम व विविध स्पर्धा आयोजित करणे अपेक्षित आहे. जनतेच्या मनात स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती तेवत राहाव्यात व देशभक्तीची जाज्वल भावना कायम स्वरुपी मनात राहावी व त्याचे संस्मरण व्हावे या उद्देशाने भारतीय “स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत दिनांक 9 ऑगस्ट 2022 ते दिनांक 17 ऑगस्ट, 2022 या कालावधीमध्ये राज्यात “स्वराज्य महोत्सव” अंतर्गत विविध उपक्रम/स्पर्धा/ कार्यक्रम राबविण्याचे निश्चित केले आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र गडचिरोली व आदिवासी उमेदवारांकरिता कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र गडचिरोली या कार्यालयाअंतर्गत पांरपारिक वेशभूषा कार्यक्रम आयोजीत करण्यांत येत असून सर्व वयोगटातील उमेदवारांनी पांरपारिक वेशभूषेत दिनांक 14 ऑगस्ट 2022 ला दुपारी 2.00 वाजता आदिवासी उमेदवारांकरीता कौशल्य्‍ विकास रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र, शासकीय संकुल बॅरेक क्र.-2,युनिट क्रमांक-2 कॉम्प्लेक्स,गडचिरोली या कार्यालयामध्ये उपस्थित रहावे. या पांरपारिक वेशभुषा कार्यक्रम अंतर्गत विजेत्या उमेदवारांना रोख पारितोषिक व प्रमाणपत्र देण्यात येईल. अधिक माहिती करिता जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र
असे सहायक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र गडिचिरोली यांनी कळविले आहे.

हे देखील वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

एकतर्फी प्रेमाचा किडा… युवतीवर केला चाकू हल्ला..

 

Comments are closed.