Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

10 लाख रूपयाचे बक्षिस असलेल्या दोन जहाल महिला माओवाद्यांनी केले आत्मसमर्पण

शामला झुरु पुडो ऊर्फ लीला चामोर्शी दलम, काजल मंगरु वड्डे ऊर्फ लिम्मी भामरागड दलम होते.

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,

गडचिरोली : आज  08 जानेवारी  रोजी दोन जहाल महिला माओवादी नामे शामला झुरु पुडो ऊर्फ लीला, कंपनी क्र. 10 पीपीसिएम/सेक्शन कमांडर, वय 36 वर्ष, रा. गट्टेपल्ली, ता. एटापल्ली, जि. गडचिरोली व काजल मंगरु वड्डे ऊर्फ लिम्मी, भामरागड दलम सदस्य, वय 24 वर्षे, रा. नेलगंुडा, ता. भामरागड, जि. गडचिरोली यांनी गडचिरोली पोलीस व सिआरपीएफ दलासमोर आत्मसमर्पण केले.

पहली माओवादी शामला झुरु पुडो ऊर्फ लीला ही 23 सप्टेंबर 2024 रोजी झालेल्या माओवादी चकमकीत मारल्या गेलेल्या डिकेएसझेडसीएम रुपेश मडावी ऊर्फ सांबा याची पत्नी आहे. 2002 मध्ये चामोर्शी दलम मध्ये सदस्य पदावर भरती होवून ती कंपनी क्र. 10 मध्ये बदली होऊन सेक्शन कमांडर या पदावर राहुन आजपावेतो काम करत होती, तिच्यावर आजपर्यंत एकुण 45 गुन्हे दाखल असून त्यामध्ये 21 चकमक, 06 जाळपोळ, व 18-इतर गुन्ह्रांचा समावेश आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

दुसरी माओवादी काजल मंगरु वड्डे ऊर्फ लिम्मी वय 24 वर्षे माहे जानेवारी 2018 मध्ये भामरागड दलममध्ये सदस्य पदावर भरती होऊन आजपावेतो कार्यरत होती.तिच्यावर आजपर्यंत एकुण 08 गुन्हे दाखल असून त्यामध्ये 04- चकमक, 01- जाळपोळ, व 03- इतर गुन्ह्रांचा समावेश आहे.गडचिरोली पोलीसांच्या सततच्या नक्षल अभियान मुळे नक्षलवाद समापत होत असल्यामुळे व वरिष्ठ माओवादी नेते फक्त स्वत:च्या फायद्यासाठी गरीब आदिवासी युवक-युवतींचा वापर करून घेतात या कारणाने आत्मसमर्पण केले.

महाराष्ट्र शासनाने शामला झुरु पुडो ऊर्फ लीला हिचेवर 08 लाख रूपयाचे बक्षीस व काजल मंगरु वड्डे ऊर्फ लिम्मी हिचेवर 02 लाख रूपयाचे बक्षीस होते आता त्यांना शामला झुरु पुडो ऊर्फ लीला हिला एकुण 5.5 लाख रुपये, काजल मंगरु वड्डे ऊर्फ लिम्मी हिला एकुण 4.5 लाख रुपये बक्षीस जाहिर केले आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

गडचिरोली पोलीस दलाने अतिशय प्रभावीपणे माओवादविरोधी अभियान राबविल्यामुळे तसेच शासनाने माओवाद्यांना आत्मसमर्पणाची सुवर्णसंधी उपलब्ध करून दिल्याने, सन्मानाने जीवन जगण्यासाठी सन 2022 ते आतापर्यंत एकुण 46 जहाल माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. सन-2025 च्या पहिल्याच आठवड¬ात 13 माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले, ज्यामध्ये 01 जानेवारी 2025 रोजी मुख्यमंंत्री महाराष्ट्र राज्य यांचे समोर 11 वरिष्ठ कॅडरच्या माओवाद्यांचाही समावेश होता.

सदर माओवाद्याचे आत्मसमर्पण घडवून मुख्यप्रवाहात आणण्याबाबतची कारवाई संदिप पाटील, पोलीस महानिरीक्षक (नक्षलविरोधी अभियान) नागपूर, अंकित गोयल, पोलीस उप-महानिरीक्षक, गडचिरोली परिक्षेत्र, अजय कुमार शर्मा, पोलीस उप-महानिरीक्षक (अभियान) सीआरपीएफ,  नीलोत्पल, पोलीस अधीक्षक गडचिरोली व जसवीर सिंग, कमांण्डट 113 बटा. सिआरपीएफ यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडली.

Comments are closed.