महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान सोहोळ्यात पालघर जिल्ह्यातील दोन श्रीसदस्यांचा मृत्यू.
लोकस्पर्श न्युज नेटवर्क
पालघर, 17 एप्रिल :आप्पासाहेब धर्माधिकारी यांचा रविवारी महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. मोठ्या दिमाखात पार पडलेल्या या पुरस्कार सोहळ्याला गालबोट लागलं. या कार्यक्रमात आलेल्या 13 जणांचा उष्माघातामुळे मृत्यू झाला आहे, तर काही जणांवर उपचार सुरू आहेत.
ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान सोहोळ्यात सहभागी १२ श्रीसदस्यांचे उष्माघातामुळे मृत्यू झाला. यामध्ये दोन जण हे पालघर जिल्ह्यातील आहेत. स्वप्निल सदाशिव किणी (३०) आणि तुळशीराम भाऊ वांगड (58) अशी त्यांची नावं आहेत.
स्वप्निल सदाशिव किणी (३०) हा विरार पूर्वेच्या भामाट पाडा येथील रहिवाशी होता. स्वप्निल याच्यावर आज सकाळी नऊ वाजता भामाट पाडा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. असून त्याच्या पश्चात आई-वडील, भाऊ, पत्नी आणि एक ५ महिन्याचा मुलगा असा परिवार आहे. स्वप्निल अतिशय मनमिळाऊ स्वभावाचा होता. त्याच्या जाण्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
तुळशीराम भाऊ वांगड (58) हे जव्हार तालुक्यातल्या जांभुळ विहीर येथील रहिवाशी होते.तुळशीराम हे व्यवसाय टेलर काम करत होते, त्यांच्या मागे पत्नी आणि दोन मुले ,सुन असा परीवार आहे. यांच्यावर आज दुपारी अतिशय शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
हे पण वाचा :-
Comments are closed.