Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

अहेरीत अवकाळी पावसाचा झटका

विद्युत लाईन ठप्प, अहेरी अलापली रस्ता काहीकाळ बंद

लोकस्पर्श न्युज नेटवर्क

अहेरी, 24 एप्रिल : अहेरी येथे सायं.पावणे पाच वाजता आलेल्या अवकाळी पावसाच्या तडाख्याने अहेरी ग्रामीण येथील 11 किलोव्याट लाईनचे विद्युत खांब खाली कोसळल्याने ग्रामीण भागातील विद्युत खंडित झालेले आहेत.तसेच आलापल्ली वरून अहेरी येथे येणारी शहरी लाईन सुद्धा तुटली असल्याने अहेरी येथील विद्युत खंडित झालेली आहे.

अहेरी आलापल्ली रस्त्यावरील शंकरराव बेझलवार महाविद्यालय जवळील एक झाड रस्त्यावर पडल्याने बसेस व इतर वाहनांची वाहतूक काही काळ बंद होती. त्यामुळे बसेस बायपास रस्त्याने दानशूर चौकातून बस स्टॉप कडे जात होती. कालांतराने वनविभागाने जेसीपी आणून रस्ता मोकळा केला.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

तसेच अहेरी येथील प्रभाग क्रमांक १४ येतील संतोष नामनवार यांच्या घराचे आज पाच वाजताच्या दरम्यान छप्पर तीव्र वारा व पावसामुळे उडून गेल्याने पन्नास ते साठ हजार रुपयांचे नुकसान झाले. तसेच अहेरी मध्ये अनेक ठिकाणी चक्रीवादळामुळे लोकांचे घरांचे नुकसान झाल्याची घटना आहे. करिता महसूल अधिकारी यांनी नुकसानग्रस्त जनतेच्या घरांचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी संतोष नामनवार यांनी केली आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे पण वाचा :-

Comments are closed.