‘लोकबिरादरी प्रकल्पात’ वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
गडचिरोली : जगप्रसिद्ध असलेल्या भामरागड येथील ‘लोकबिरादरी प्रकल्प’ चाआज ५१ वा वर्धापन दिन असून प्रकल्पात वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. वरोरा महारोगी सेवा समितीद्वारा संचालित ‘लोकबिरादरी प्रकल्प’ अविरत गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी नक्षल बहुल क्षेत्रात गेल्या ५१ वर्षापासून गोर गरीब बांधवांची निरपेक्षपणे सेवा करीत आहे. लोकबिरादरी प्रकल्प म्हणजे डॉ. प्रकाश व डॉ. मंदाकिनी आमटे आणि अनेक कार्यकर्त्यांची कर्मभूमी आहे. 23 डिसेंबर रोजी या प्रकल्पाला ५१ वर्ष पूर्ण झाले आहेत. आदिवासी विकासासाठी अविरत कार्यरत असणाऱ्या, अनेकांसाठी प्रेरणादायी आणि सामाजिक कार्यासाठी ऊर्जा देणाऱ्या या प्रकल्पाचा आज वर्धापन दिन होय .
अति दुर्गम समजल्या जाणाऱ्या लोकबिरादरी प्रकल्प भोळ्या भाबल्या आदिवासी बांधवांची माने जिंकून मुख्यप्रवाहात आणण्याचा विशेष प्रयत्न तसेच आरोग्याच्या व्यवस्थेसाठी संपूर्ण जीवन सेवेत वाहून घेतल्याने जगभरात ओळख निर्माण झाली आहे .आज लोकबिरादरी प्रकल्पात सुसज्य रुग्णालयाच्या इमारतीमध्ये उत्कृष्ट आरोग्य सुविधा आदिवासी बांधवांना व इतरांना दिली जाते. तसेच पहिली ते १२ वीपर्यंतचे शिक्षण लोकबिरादरी आश्रमशाळेच्या माध्यमातून ६५० विद्यार्थ्यांना दिले जाते.
विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी सर्व सोयीने सुसज्ज असलेली वसतिगृहे प्रकल्पात आहेत.अकरावी, बारावी विज्ञान शाखेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना नीट (मेडिकल प्रवेश परीक्षा) चे शिक्षण सुद्धा दिले जाते.अतिदुर्गम ६ गावात हेल्थ सेंटर चालविले जाते.
अतिदुर्गम नेलगुंडा गावात २०१५ पासून साधना विद्यालय नावाने इंग्रजी माध्यमाची शाळा बालवाडी ते ५ वीपर्यंत चालविली जाते. तसेच भामरागड आणि अहेरी तालुक्यात मिळून ३० तलावांची निर्मिती प्रकल्पामार्फत करण्यात आली आहे. प्रकल्पाच्या अनाथालयात जवळपास १२० वन्यप्राणी आनंदाने जीवन घालवत आहेत. शिकारीत अनाथ झालेले किंवा जंगलात अनाथ सापडलेले हे सर्व वन्यप्राणी प्रकल्पात आईच्या मायेने वाढविले आहेत. या अनाथ प्राण्यांना अभय देण्याचे कार्य गेली ५१ वर्ष लोकबिरादरी प्रकल्पातील कार्यकर्ते करीत आहेत.
लोकबिरादरी प्रकल्पाची स्थापना बाबा आमटे यांनी २३ डिसेंबर १९७३ रोजी केली. बाबा आमटे यांचे कनिष्ठ चिरंजीव डॉ. प्रकाश आमटे व त्यांच्या पत्नी डॉ. मंदाकिनी आमटे यांनी सर्व अडचणींवर मात करत हा प्रकल्प उभारण्यात आला असून सर्व जबाबदारी त्यांच्या मुलांनी व सुनांनी डॉ. दिगंत आमटे व डॉ. अनघा आमटे आणि अनिकेत व समीक्षा यांनी स्वीकारली आहे. आज कामाचा वसा जशास तसा जोपासला जात असून आजही कामातून वेगळी ओळख ५१ वा वर्धापन दिनी पहावयास मिळतो.
हे देखील वाचा ,
स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानंतरही गावात सोयी-सुविधांचा अभाव, प्रशासनाचे दुर्लक्ष
Comments are closed.