Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

नुकसानग्रस्त भागाची पाहणी करताना खा. नवनीत राणाचे अश्रू अनावर

पंढरपूरला गाडी चालवत जाणाऱ्या मुख्यमंत्रीनी विदर्भाच्या समस्या बघा..खा नवनीत राणा खासदार नवनीत राणाचा मुख्यमंत्रीना थेट प्रश्न

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

अमरावती २४ जुलै : हवामान खात्याच्या दिलेल्या माहिती प्रमाणे विदर्भात मुसळदार पाऊस येणार असे अंदाज वर्तविण्यात आले होते त्यानुसार  तीन दिवसांपासून पावसाची संततधार अमरावतीत सुरु आहे .त्यामुळे शेतीसह अनेक घराचं देखील नुकसान झाले आहे . सद्या नदी नाले तुडुंब भरून वाहात आहेत .

लोकसभेच आज  कामकाज आटोपून खा. नवनीत राणा थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचल्यात त्यावेळी पाऊस सुरू असताना त्यांनी खार तळेगाव, टाकरखेडा, रामा साहुर, शिराळा येथे झालेल्या नुकसानग्रस्त भागाची चिखलात जाऊन पाहणी केली आहे. अनेकांच्या घराची पावसाने पडझड झाल्याने त्याच्यावर उपासमारीची वेळ आहे. ही परिस्थिती बघताना खासदार नवनीत राणाचे अश्रू अनावर झालेत.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

त्यावेळी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. गाडी चालवत पंढरपूरला जाणारे मुख्यमंत्री यांनी विदर्भाची पावसाने झालेली परिस्थिती पहावी. नागरिकांच्या समस्या जाणून घ्याव्यात. जो पर्यंत अमरावतीत नुकसानग्रस्त भागाची पाहणी करणार नाहीत तर तुम्हाला कळणार कस. मदत कशी दिली जाणार असा प्रश्न थेट खा. नवनीत राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विचारला आहे.

Comments are closed.