Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत माहे सप्टेंबर महिन्याचे अन्नधान्य वाटपाबाबत

Regarding the distribution of foodgrains for the month of September under the National Food Security Plan

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली,  09 सप्टेम्बर : गडचिरोली जिल्हयातील सर्व रेशनकार्डधारकांना सुचित करण्यात येते की, गडचिरोली जिल्हयात मका  खरेदी करण्यात आलेला असून खरेदी झालेला मका या भरडधान्याची सार्वजनिक वितरण व्यवस्थे अंतर्गत गव्हाचे नियतन कमी करुन त्याऐवजी मक्याचे वितरण करण्याचे शासन निर्देश प्राप्त आहे. तरी राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत  माहे सप्टेंबर, 2021करिता अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटूंबातील पात्र लाभार्थ्यांना  गहू , तांदूळ, साखर व मक्याचे नियतन व वाटप परिमाण पुढील प्रमाणे निश्चित करण्यात आलेले आहे. अंत्योदय अन्न योजनेअंतर्गत प्रती शिधापत्रिका 25 किलो तांदुळ रुपये 3 प्रति किलो प्रमाणे, गहू 5 किलो 2 रुपये प्रति किलो प्रमाणे, मका 5 किलो 1 रुपये प्रतिकिलो प्रमाणे तर 1 किलो साखर 20 रुपये प्रति किलो प्रमाणे. तर प्राधान्य कुटुंब लाभार्थी यांना प्रती व्यक्ती  3 किलो तांदुळ 3 रुपये प्रति किलो प्रमाणे, 1 किलो गहू 2 रुपये प्रतिकिलो प्रमाणे, 1 किलो मका  1 रुपये प्रतिकिलो प्रमाणे मिळेल.

त्याचप्रमाणे Corona Virus (Covid-19) च्या प्रादुर्भावामुळे आलेल्या आर्थिक व्यत्ययामुळे गरीबांना सामोरे जावे लागत असलेल्या कठीण प्रसंगाच्या पार्श्वभुमीवर प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत लक्ष्य निर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील गडचिरोली जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांना राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत अनुज्ञेय असलेल्या अन्नधान्याव्यतिरिक्त माहे जुलै, 2021 ते नोव्हेंबर, 2021 या महिन्यासाठी अंत्योदय अन्न योजनेचे व प्राधान्य कुटूंब लाभार्थी योजनेचे प्रतिव्यक्ती 2 किलो गहू व 3 किलो तांदूळ परिमाणानुसार प्रति सदस्य 5 किलो अन्नधान्याचे (गहू व तांदूळ) “मोफत” वाटप करण्यात येत आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

तरी सर्व पात्र शिधापत्रिकाधारकांना सुचित करण्यात येत की, त्यांना नेमून दिलेल्या स्वस्त धान्य दुकानात जावून आपले शिधापत्रिकेवर राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील माहे सप्टेंबर, 2021 महिन्यातील नियमित देय असलेल्या संपूर्ण अन्नधान्याची उचल करावी. व धान्य घेतेवेळी POS मशीन मधून निघणारे बिल घेवून, बिल पावतीवर नमूद असलेली रक्कम देण्यात यावी. व सोबतच नियमित अन्नधान्याव्यतिरिक्त माहे सप्टेंबर, 2021 या महिन्यासाठी प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेतील देय असलेल्या संपूर्ण अन्नधान्याची “मोफत” उचल करावी. दुकानात एकाच वेळी गर्दी न करता सामाजिक अंतराचे पालन करावे.

मासिक केरोसीन निर्धारित वाटप परिमाण (गॅस नसल्याचे हमीपत्र सादर केलेल्या शिधापत्रिकाधारकांसाठी) पुढील प्रमाणे असेल. शिधापत्रिकावरील व्यक्तीची संख्या एक व्यक्ती असल्यास अनुज्ञेय वाटप परिमाण दोन लिटर, दोन व्यक्ती असल्यास तीन लिटर,  व तीन व्यक्ती वा त्याहून अधिक व्यक्ती असल्यास चार लिटर मिळेल असे जिल्हा पुरवठा अधिकारी, गडचिरोली यांनी कळविले आहे.

 

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा :

गेवरा(खुर्द)परिसरातील नरभक्षक वाघास जेरबंद करा ! खा. अशोक नेते यांचे वनाधिकाऱ्यांना निर्देश

 

गडचिरोली जिल्ह्यात 726 तपासण्यांपैकी 1 कोरोना बाधित तर 5 कोरोनामुक्त

 

 

Comments are closed.