Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

वडसा पंचायत समितीतील निधी असतानाही सेवानिवृत्ती वेतन रोखले

वडसा लोकस्पर्श न्यूज नेटवर्क:- वडसा जिल्हा परिषदेकडून निधी उपलब्ध करून देण्यात आल्यावर सुध्दा देसाईगंज वडसा पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे वेतन रोखल्याचा प्रकार समोर आला आहे. वारंवार होणाऱ्या या प्रकारामुळे कर्मचाऱ्यांमध्ये रोष व्यक्त करण्यात येत आहे. सेवानिवृत्ती वेतन महिन्याच्या १ ते ५ तारखेपर्यंत देण्यात यावे असे राज्य शासनाचा आदेश आहे. मात्र वडसा पंचायत समिती या आदेशाला हरताळ फासत असल्याचे दिसून येते. निवृत्तीवेतन देण्याकरिता आवश्यक निधी जिल्हा परिषदेकडून केव्हाच पंचायत समितीला प्राप्त झाला आहे. तरी सुध्दा येथील संबंधित कर्मचारी सेवानिवृत्ती वेतन काढण्यासाठी विलंब करीत असल्याचे चित्र आहे. विचारणा केली असता अद्याप देयक बनविण्यात न आल्याचे उत्तर देण्यात येते.

सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे वेतन असो अथवा थकबाकी याची परितीपूर्ती करण्यास वडसा पंचायत समितीकडून नेहमीच विलंब करण्यात येते. यामुळे कर्मचाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागतो. येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा वाचक नसल्याने हा प्रकार घडत असल्याचे कर्मचारी सांगतात. मात्र यामुळे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना चकरा माराव्या लागत आहे. तक्रार करून देखील कुणीही याकडे लक्ष देत नाही. मार्च महिन्याच्या निधी पहिल्या आठवड्यातच प्राप्त झाला परंतु १७ तारीख आल्यावर देखील सेवानिवृत्ती वेतन जमा झाले नाही. या प्रकाराकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन योग्य कारवाई करावी अशी मागणी सेवानिृत्त कर्मचाऱ्यांनी केली आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

Comments are closed.