Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

विश्व संवाद केंद्र चंद्रपूर तर्फे उद्या ऑनलाईन पद्धतीने आद्य पत्रकार नारद जयंती कार्यक्रम

प्रसारमाध्यमांसाठीं व्याख्यानाचे आयोजन.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली 29 मे:- विश्व संवाद केंद्र चंद्रपूर विभागातर्फे आद्य पत्रकार नारद जयंती निमित्ताने उद्या दिनांक 30 मे रविवारी आभासी माध्यमाद्वारे प्रसारमाध्यमांसाठी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. या वेळी प्रमूख वक्ते म्हणून प्रमोदजी बापट, क्षेत्र प्रचार प्रमुख, रा.स्व.संघ मुंबई हे राहणार आहेत.

रसार माध्यमांची भूमिका राष्ट्रहित, राष्ट्ररक्षा सर्वोपरी अशीच असावी, वर्तमान संदर्भांसह अपेक्षा या विषयावर ते आपले मत मांडनार आहेत.विश्व संवाद केंद्रातर्फे दरवर्षी आद्य पत्रकार नारद जयंती समारोह आयोजित केला जातो. पत्रकारांसाठी वेगवेगळ्या मुद्द्यावर या निमित्ताने व्याख्यानाचे आयोजन उद्या दुपारी चार वाजता करण्यात येत आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

फेसबुक पेज लिंक
https://www.facebook.com/vskchandrapur/ ह्या पेजवर या कार्यक्रमाचे थेट प्रसारण होणार आहे.त्यामुळे या ऑनलाइन कार्यक्रमात जास्तीत जास्त संख्येने सहभागी होऊन कार्यक्रम यशस्वी करावा असे आवाहन विश्व संवाद केंद्र चंद्रपूर विभागातर्फे करण्यात येत आहे.

Comments are closed.