Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

त्र्यंबकची राजकीय बदनामी सहन करणार नाही ग्रामस्थांनी जाहीर केली भूमिका

दोन महिन्यापूर्वीच दंगलीची भीती व्यक्त केली होती- डाॅ.जितेंद्र आव्हाड

लोकस्पर्श न्युज नेटवर्क

ठाणे, 18 मे – ठाणे त्र्यंबक गावात हिंदू-मुस्लिमांमध्ये प्रचंड एकोपा आहे. मात्र, 13 मे रोजी जो प्रकार घडला तो चुकीच्या पद्धतीने मांडून राजकीय लाभासाठी त्र्यंबक गावाची “राजकीय बदनामी” करण्यात आली. ही बदनामी सहन केली जाणार नाही, असे सांगत ज्या तरूणाला लक्ष्य केले आहे. तो तरूण आपली पूर्वापार परंपरा पार पाडत होता, असे ग्रामस्थांनी सांगितले. तर, आपण दोन महिन्यापूर्वीच राज्यात दंगली भडकावण्याचे प्रयत्न केले जाणार असल्याची भीती आपण व्यक्त केली होती. ती भीती खरी ठरत आहे, असे डाॅ.जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

त्र्यंबकेश्वर मंदिरात मुस्लीम धर्मियांनी घुसण्याचा प्रयत्न केला असल्याची आवई उठवून अनेक संघटनांनी शुद्धीकरणाचे प्रयत्न केले होते. या गावातील नागरिकांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, मा. मंत्री डाॅ.जितेंद्र आव्हाड यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधून गावातील वस्तुस्थिती मांडली. यावेळेस डाॅ.जितेंद्र आव्हाड यांनी, ” त्र्यंबक गावाची लोकसंख्या चौदा हजार आहे. येथे सुमारे चाळीस हजार भाविक येत असतात. मंदिर परिसरात इतर धर्मियांची दुकाने आहेत. हे लोक भोलेनाथमुळेच आपले घर चालते, या भावनेतून पायरीसमोर धूप दाखवतात. तसेच, पायरीवर शाल अंथरतात. शेकडो वर्षांपासून ही परंपरा चालू आहे. सलीम यानेही तसेच केले होते. पण, काही नतद्रष्टांनी चुकीच्या पद्धतीने मांडणी करून धार्मिक विद्वेष पसरविण्याचा प्रयत्न केला.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

मंदिराच्या उभारणीपासून प्रथमच हा वाद निर्माण केला आहे. महाराष्ट्र पेटवण्याची संधीच शोधली जात आहे. या लोकांनी सांगण्यासारखे काही केलेले नाही. या लोकांना मूर्ती घडविणे जमलेले नाही. त्यामुळेच ते ओबाडधोबाड दगड उभे करीत आहेत. अन् आपली जात, आडनावे लपवणारे लोक महाराष्ट्र पेटवण्याचा प्रयत्न करतात. पण, सबंध गाव सलीमच्या पाठीशी उभा आहे. आज सलीम दुकान बंद करून घरात बसलाय . आता भय याचे आहे की या गावाचे अर्थकारण बिघडणार आहे. या गावात भीतीमुळे भाविक येणार नाहित. परिणामी अर्थकारण बिघडेल. त्याचा फटका गावाच्या प्रगतीवर, मुलाबाळांच्या शिक्षणावर होईल, ” असे सांगितले.

दरम्यान, त्र्यंबकचे माजी उपनगराध्यक्ष संजय कदम यांनी घडलेल्या प्रकाराची सत्यता मांडली. ते म्हणाले, तेरा तारखेला जो प्रकार घडला तो चुकीच्या पद्धतीने मांडला गेला. जणूकाही येथे दंगलच पेटली गेली, असे भासवण्यात आले. ज्या ठिकाणी धूप दाखविण्यात आला. त्या मार्गावरून अनेक जातीधर्माच्या मिरवणुका जात असतात. या मिरवणुका महादेवाला धूप दाखवून अथवा इतर माध्यमातून नमन करीत असतात. पण, नवीन सुरक्षारक्षक असल्याने त्यांना ही परंपरा माहित नव्हती अन् त्यातून गैरसमज पसरविण्यात आला. हा विषय पाचच मिनिटात संपला होता. पण, काही लोकांनी हा वाढविला. सलीम हा तरूण सामाजिक सौहार्द बाळगणारा आहे. तो आपल्या बोलण्याची सुरूवात जय भोलेनाथ या शब्दांनीच करतो. पण, काही लोकांनी राजकीय फायद्यासाठी हा प्रकार केला आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

उपमुख्यमंत्र्यांनी एसआयटीची नियुक्ती करण्याची घोषणा केली आहे. वास्तविक एसआयटीची गरज नाही. या प्रकारातून गावाची बदनामी केली गेली. म्हणून एसआयटीची गरज नाही. दरम्यान, पुरूषोत्तम कडलक यांनी, मंदिरांना धोका आहे, असे मेसेज पसरविले जात आहेत. वातावरण गढूळ नसतानाही भडकावले जात आहे. त्यास शांततेने उत्तर दिले जाईल, असे सांगितले.

Comments are closed.