Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

अभिनेत्री माधुरी दीक्षितने करिअरच्या शिखरावर असताना फिल्म इंडस्ट्री का सोडली ?

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये धकधक गर्ल म्हणुन प्रसिध्द असलेली स्टार अभिनेत्री माधुरी दीक्षित आपल्या  करिअरच्या उच्चतम  शिखरावर पोहचल्यानंतर फिल्म इंडस्ट्री सोडण्याचा निर्णय घेऊन सर्वांनाच मोठा धक्का दिला होता. 1999 मध्ये माधुरीने डॉ. श्रीराम नेने यांच्याशी लग्न करण्यासाठी बॉलिवूड इंडस्ट्री सोडण्याचा निर्णय घेतला होता.  लग्नानंतर ती पती नेनेंसोबत कोलोरॅडोला राहायला गेली.

एका  मुलाखतीत माधुरी म्हणाली की, मी लग्न करून  खूप खुश होते, कारण माझ्यासाठी हे सगळ  महत्त्वाच  नव्हत. मला अभिनय, नृत्य  आवडत होतं. आणि माझ्या करिअरमध्ये मी जे काही केलं, ते सर्व आवडत होतं.  त्या सगळ्यात माझा खूप रस होता. त्यासोबत मिळणाऱ्या इतर गोष्टी या आनंददायक आहे म्हणुन मी करते. लोक मला स्टार समजतात, हे माझ्यासाठी बोनस आहे. पण मी स्वत:कडे कधीच त्या दृष्टीने पाहत नाही.  मी आता प्रकाशझोतात नसेन. मी माझ्या करिअरच्या उच्चतम शिखरावर असताना लग्न करत आहे असा  मी कधीच  विचार केला नाही.”

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

1993 ते 2013 या काळात माधुरीने तेजाब, ‘पुकार’, ‘गजगामिनी’, ‘ये रास्ते है प्यार के’, ‘लज्जा’, ‘हम तुम्हारे है सनम’, ‘देवदास’, ‘आजा नचले’, ‘दिल तो पागल है’ यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलं. आणि आपल्या अभिनयातून लोकांच्या मनात घर केल. मी फक्त एवढाच विचार केला की मला नेनेंसारख्या व्यक्तीशी लग्न करायचं होतं, मी योग्य व्यक्तीला भेटले आणि त्यांच्याशी मी लग्न केलं प्रत्येकाचं स्वत:करिता स्वप्न राहत . माझंही  स्वप्न होतं की माझं घर असावं, पती असावा, कुटुंब आणि मुलंबाळं असावीत.जेव्हा लोक म्हणतात की  तू इंडस्ट्रीपासून दूर गेलीस आणि तुला इथली आठवण येत नाही का  तर मला त्यांना  हेच सांगायच आहे की, मला तिथली  आठवण  नाही आली कारण की  मी माझं स्वप्न जगत होती.

झगमगत्या इंडस्ट्रीपासून  दूर अनेक वर्ष परदेशात राहिले नंतर  2011 मध्ये त्यांनी त्यांच्या आरिन आणि रायन या दोन मुलांसह भारतात परत येण्याचा निर्णय घेतला. माधुरी नुकतीच ‘भुलभुलैय्या 3’ या चित्रपटातून परत एकदा  प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. नुकताच भुलभुलैय्या 3 या चित्रपटाच्या निमित्त दिलेल्या एका मुलाखतीत ती लग्नानंतर देश आणि फिल्म इंडस्ट्री सोडण्याच्या निर्णयाबद्दल मोकळेपणे व्यक्त केली.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.