बिबी का मकबरा येथे जागतिक वारसा दिन साजरा
लोकस्पर्श न्युज नेटवर्क
छत्रपती संभाजीनगर, 18 एप्रिल :भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालया अंतर्गत येणाऱ्या केंद्रीय संचार ब्यूरो, क्षेत्रीय कार्यालय छत्रपती संभाजीनगर आणि भारतीय पुरातत्व सर्वेक्षण, छत्रपती संभाजीनगर विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने बिबी का मकबरा येथे जागतिक वारसा दिनानिमित्त आज वेरुळ व अजिंठा लेणी चित्रप्रदर्शनी, शाहीर जाधव व संच यांचा सांस्कृतिक कार्यक्रम तसेच विद्यार्थ्यांसाठी प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. राज्यमाहिती आयोग, संभाजीनगर विभागाचे उपसचिव राजाराम सरोदे यांनी जागतिक वारसा चित्रप्रदर्शनीचे उद्घाटन केले.
सांस्कृतिक कार्यक्रमात शाहिर जाधव व संच यांच्या देश्भाक्तिपर पोवाडा, पथनाट्य, गीत आदी तसेच शासकीय ज्ञान विज्ञान महाविद्यालय, संगीत विभागाचे विद्यार्थी सचिन इघारे, आकांशा फुंडे व केंद्रीय संचार ब्युरोच्या प्रीती पवार यांनी देश्भाक्तिपर गाणी सादर केली. प्रश्नमंजुषा स्पर्धेत विद्यार्थी विकास देवकाते, रोनक खोब्रागडे, मोहम्मद मुस्ताक्विम व गौरव थोरात विजेते ठरले, या विद्यार्थ्यांना पुरस्कार व प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी भारतीय पुरातत्व सर्वेक्षण, छत्रपती संभाजीनगर सर्कलचे उपअभियंता, एम. सांबा शिवकुमार, प्रशासनिक अधिकारी, विलिश रामटेके, सहा. अधिक्षक, डॉ. प्रशांत सोनोने, सहा. अधिक्षक-अभियंता, डी. एस. दानवे, कन्स्ट्रक्शन सहायक, संजय रोहनकर, सहा. पुरातत्वेत्ता, रजनिशकुमार, नंदकुमार विश्वपुरिया, केंद्रीय संचार ब्यूरोचे प्रबंधक संतोष देशमुख, सहा. क्षेत्रीय प्राचर अधिकारी, प्रदीप पवार, कार्यालय सहा. प्रीती पवार व ज्ञानेश्वर विद्यालायाचे मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
हे पण वाचा :-
Comments are closed.