Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

रान मांजर अचानक घरात आली ; आईच्या कुशीत झोपलेल्या जुळी बाळातील एकाला अलगद उचलून नेलं अन्…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

उत्तर प्रदेश दि, २६ जुलै :  बदायू जिल्यातील गौतरा पट्टी भौनी गावात एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. एका कुटुंबात जुळ्या बाळांचा जन्म झाला होता बाळाची आई सोमवारी रात्री जुळ्या बाळांना कुशीत घेऊन झोपली होती.याच वेळी एक रानमांजर घरात प्रवेश केला आणि एका बाळाला अलगद उचलून घराच्या छतावर घेऊन गेली.यानंतर हे बाळ छतावरून नेत असताना खाली पडल्याने त्या बाळांचा  मृत्यू झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हसनची पत्नी आसमाने 15 दिवसांपूर्वी जुळ्या बाळांना (एक मुलगा एक मुलगी) जन्म दिला होता.

या जुळ्यांच्या जन्मानंतर मुलाचे नाव रिहान आणि मुलीचे नाव अलशिफा ठेवण्यात आले. मुलगा आणि मुलगी सोबत जन्माला आल्याने घरातील वातावरण अत्यंत प्रसन्न होते. मात्र सोमवारी रात्री कुटुंबीयांच्या आनंदाचे रूपांतर शोकात झाले. हसनने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, जुळ्यांच्या जन्मानंतर एक रानमांजर रोज घरात येत होती. मात्र आम्ही तिला हाकलून देत होतो. हसनच्या म्हणण्यानुसार, सोमवारी रात्रीही ही मांजर घरात आली होती .

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

आईच्या घरातील काम आटपुन रात्री 10 वाजण्याच्या सुमारास झोपी गेल्या होत्या .दरम्यान याच वेळी एका रानमांजराने घरात प्रवेश करून अलगद उचलुन रिहानला तोंडात पकडून पळू लागताच क्षणातच आईचे डोळे उघडले. तेव्हा एक रानमांजर रिहानला घेऊन जात असल्याचे तिच्या लक्षात आले आणि तिने आरडा ओरड करायला सुरुवात केली. हे ऐकून हसन मांजरीच्या मागे धावला. मात्र तोपर्यंत  मांजरीने मुलाला गच्चीवरून खाली जमिनीवर पडताच बाळाचा जागीच मृत्यू झाला.

उसावा पोलीस ठाण्याचे प्रभारी रामेंद्र सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, जंगली मांजरीने नवजात बाळाला तोंडात दाबून छतावरून खाली टाकले. या घटनेत नवजात बाळाचा मृत्यू झाला. तसेच, नातेवाईकांनी कुठल्याही प्रकारचे तक्रार दिलेले नाही असेही त्यांनी सांगितले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा,

कोळसा घोटाळा प्रकरणी राज्यसभेचे माजी खा. विजय दर्डा आणि मुलगा देवेंद्र दर्डा यांना चार वर्षांची शिक्षा

अर्थव्यवस्थेत जागरूकता आणण्यासाठी सर्क्युलर इकॉनॉमी कॅम्पेनचे आयोजन

Comments are closed.