Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

BCCI नं रद्द केली रणजी ट्रॉफी क्रिकेट स्पर्धा

भारतीय क्रिकेटपटू घडवणारी सर्वात मोठी स्पर्धा असलेली रणजी ट्रॉफीस्पर्धा रद्द

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

मुंबई, 30 जानेवारी : भारतीय क्रिकेटपटू घडवणारी सर्वात मोठी स्पर्धा असलेली रणजी ट्रॉफी   स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डानं (BCCI)  घेतला आहे. BCCI चे सचिन जय शहा यांनी याबाबतची माहिती सर्व राज्य संघटनांना पत्राद्वारे कळवली आहे. त्याचबरोबर रणजी ट्रॉफीच्या दरम्यान मॅच फीसच्या रुपात दररोज 45 हजार रुपये कमावणाऱ्या खेळाडूंना नुकसान भरपाई देण्याचा निर्णय देखील BCCI नं घेतला आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

BCCI कडं रणजी स्पर्धा घेण्यासाठी पुरेसा वेळ नाही. इंडियन प्रीमियर लीग मार्च महिन्याच्या शेवटी सुरु होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या स्पर्धेतील खेळाडूंना आयपीएलसाठी उपलब्ध राहवं लागेल. रणजी ट्रॉफी आणि विजय हजारे ट्रॉफीमधील कोणती स्पर्धा खेळवायची याबाबत BCCI मध्ये संभ्रम होता. त्यामुळे त्यांनी सर्व राज्य संघटनांना पत्र लिहून त्यांचं मत विचारलं होतं. त्यावेळी बहुतेक संघटनांनी विजय हजारे ट्रॉफी खेळवण्यास पसंती दिली होती. BCCI चे अध्यक्ष सौरव गांगुली मात्र रणजी ट्रॉफी खेळवण्याच्या बाजूनं होते.

कोणती स्पर्धा होणार?

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

सय्यद मुश्ताक अली T20 स्पर्धा सध्या सुरु आहे. ही स्पर्धा झाल्यानंतर विजय हजारे ट्रॉफी स्पर्धा घेण्याचा निर्णय BCCI नं घेतला आहे. रणजी ट्रॉफी स्पर्धेत चार दिवसांच्या लढती असतात. विजय हजारे ट्रॉफीमनध्ये एक दिवसांच्या लढती असतात.

Comments are closed.