Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

LPG Cylinder :- नववर्षाच्या पहिल्याच दिवशी महागले

Get real time updates directly on you device, subscribe now.

तेल मार्केटिंग कंपन्यांनी (HPCL, BPCL, IOC) वर्षाच्या पहिल्या दिवशी गॅस सिलेंडरच्या किंमतीत वाढ केली आहे.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली डेस्क, 01 जानेवारी:- तेल मार्केटिंग कंपन्यांनी (HPCL, BPCL, IOC) वर्षाच्या पहिल्या दिवशी गॅस सिलेंडरच्या किंमतीत वाढ केली आहे. गेल्या महिन्यात 2 वेळा घरगुती गॅसच्या किमती वाढल्या होत्या. यानंतर विना-सबसिडीच्या 14.2 किलोग्रामच्या एलपीजी सिलेंडरच्या किंमती 644 रुपयांवरून वाढून 694 रुपये प्रति सिलेंडर झाल्या होत्या. आता विना-सबसिडीच्या 14.2 किलोग्रामच्या एलपीजी सिलेंडरच्या किमतीत वाढ झाली नसून कमर्शिअल  गॅस सिलेंडरच्या किंमतीत वाढ झाली आहे. व्यवसायिक सिलिंडर किंमतीच्या संदर्भात ही दरवाढ करण्यात आली असल्याचे सांगितले जात आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

गेल्या महिन्यात व्यवसायिक गॅस सिलिंडरच्या किंमतीत ९१ रुपयांनी वाढ करण्यात आली होती. तर नोव्हेंबर महिन्यात १९ किलोच्या व्यवसायिक गॅस सिलिंडर वापरणाऱ्या ग्राहकांना १२९० रूपयात मिळत होता. तर डिसेंबरपासून या व्यवसायिक गॅस सिलिंडरचे दर ९१ रूपयांनी वाढले आणि सिलिंडरच्या किंमतीत वाढ होऊन १३८१.५० रूपये झाले आहे. हे पण वाचा:- धान खरेदीची मर्यादा न वाढविल्याने महामंडळ व राज्य सरकारप्रती शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

मुंबई शहरासंदर्भातील परिस्थिती पाहता हे दर १,२९७.५० रूपयांपासून १,४६३.५० रूपयांपर्यंत वाढले आहेत. सरकारने घरगुती गॅस सिलेंडरवरील किंमती सबसिडी देखील बंद केली आहे. सारकरडून घरगुती गॅस सिलेंडरवरील सबसिडी बंद केल्यामुळे सामान्यांना दुहेरी फटका मिळाला आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.