Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

खुशखबर! राखीव प्रवर्गातील उच्च गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना खुल्या वर्गात प्रवेश, सुप्रीम कोर्टाचा निर्णय

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

वृत्तसंस्था, दि. ७ मार्च: सुप्रीम कोर्टानं शुक्रवारी एका खटल्यात महत्वपूर्ण निकाल दिला आहे. राखीव प्रवर्गातील विद्यार्थ्यानं खुल्या प्रवर्गासाठी निश्चित केलेले गुण मिळवल्यास त्यांना खुल्या प्रवर्गात प्रवेश देण्यात यावा, असा निकाल सुप्रीम कोर्टानं दिला आहे. राखीव प्रवर्गातील गुणवत्तापूर्ण विद्यार्थ्यांना राखीव प्रवर्गात ठेवू नये, असा निकाल कोर्टान दिला आहे.

सुप्रीम कोर्टानं शुक्रवारी मागासवर्गीय किंवा राखीव प्रवर्गातील विद्यार्थ्यांने त्या प्रवर्गासाठी निश्चित केलेल्या गुणांपेक्षा जास्त गुण मिळवल्यास त्यांची निवड खुल्या प्रवर्गासाठी व्हावी, असं म्हटलं. खुल्या प्रवर्गासाठी निश्चित केलेल्या गुणांएवढे गुण राखीव प्रवर्गातील विद्यार्थ्यानं मिळवल्यास त्याला खुल्या वर्गात प्रवेश देण्यात यावा, असं न्यायालयानं म्हटलं आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

महाराष्ट्रातील परिस्थिती

महाराष्ट्रात लोकसेवा आयोगाच्यावतीनं मागासवर्गीय विद्यार्थ्यांना खुल्या प्रवर्गाचं आरक्षण घ्यायचे असल्यास त्यांनी खुल्या प्रवर्गासाठी विहीत करण्यात आलेली परीक्षा फी भरण्यास सांगतिले जाते. मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी खुल्या प्रवर्गाची फी भरल्यास त्यांना दोन्ही प्रवर्गाचा लाभ घेता येतो. सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयाचा महाष्ट्रावर काय परिणाम होतो हे पाहावं लागणार आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.