Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

सुरजागड लोहखनिज खाणीला ५-स्टार रेटिंगचा सर्वोच्च बहुमान

गडचिरोलीच्या घनदाट जंगलातून राष्ट्रीय कीर्तीचा झेंडा ...

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली जिल्ह्यातील सुरजागड येथील लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडच्या लोहखनिज खाणीने देशातील सर्वोच्च खाण गुणवत्तेचा बहुमान मिळवत इंडियन ब्युरो ऑफ माइन्सकडून (IBM) ५-स्टार रेटिंग प्राप्त केले आहे. ७ जुलै रोजी जयपूर येथील राजस्थान इंटरनॅशनल सेंटरमध्ये पार पडलेल्या भव्य समारंभात केंद्रीय कोळसा व खाण मंत्री जी. किशन रेड्डी यांच्या हस्ते एलएमईएलच्या अधिकाऱ्यांना हे प्रतिष्ठित प्रमाणपत्र आणि स्मृतिचिन्ह प्रदान करण्यात आले. या प्रसंगी केंद्रीय राज्यमंत्री  सतीश चंद्र दुबे, आयबीएमचे प्रभारी महानीरीक्षक पीयूष नारायण शर्मा, तसेच मुख्य खाण नियंत्रक पंकज कुलश्रेष्ठ यांची उपस्थिती होती.

५-स्टार रेटिंग ही मान्यता केवळ उत्पादन क्षमतेवर आधारित नसून कार्यचालनातील कार्यक्षमता, पर्यावरणीय संवेदनशीलता, सामाजिक बांधिलकी आणि सुरक्षितता या चारही क्षेत्रांतील उत्कृष्टतेच्या आधारावर दिली जाते. एलएमईएलच्या सुरजागड खाणीने खाण मंत्रालयाने तयार केलेल्या शाश्वत विकास मार्गदर्शक तत्त्वांनुसार (SDF) सर्वच निकषांमध्ये ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळवत देशात आदर्श निर्माण केला आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

या यशाबद्दल आनंद व्यक्त करताना एलएमईएलचे व्यवस्थापकीय संचालक बी. प्रभाकरन यांनी सांगितले की, “ही केवळ आमच्या कंपनीची नव्हे, तर गडचिरोली जिल्ह्यातील जनतेच्या सामूहिक प्रयत्नांची पावती आहे. उत्पादन वाढीसोबत पर्यावरण रक्षण आणि सामाजिक समावेशकतेसाठी आम्ही बांधील आहोत.”

एलएमईएलने सुरजागड खाणीत हरित नवोपक्रमांची अंमलबजावणी करत आधुनिक, पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाचा वापर सुरू केला आहे. एलएनजी व बॅटरीवर चालणारी जड उपकरणे, इलेक्ट्रिक कॉम्प्रेसर ड्रिल्स, पाण्याचे पुनर्वापर यंत्रणा, सेंद्रिय कचऱ्याचे व्यवस्थापन आणि पर्यावरणीय मानांकन असलेल्या हवेच्या गुणवत्ता निरीक्षणाचे तंत्रज्ञान यामुळे एलएमईएलचा उपक्रम देशातील आदर्श मानला जात आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

सामाजिक उत्तरदायित्वाचाही ठसा गडचिरोलीमध्ये उमटवताना एलएमईएलने हेडरी येथे सीबीएसई संलग्न लॉयड्स राज विद्या निकेतन शाळा, आधुनिक सुविधांनी युक्त लॉयड्स काली अम्मल मेमोरियल हॉस्पिटल, महिलांसाठी ‘वन्या’ नावाचे कपडे उत्पादन केंद्र, वाहनचालक प्रशिक्षण संस्था, खेळ व कौशल्य विकास उपक्रम यांसारख्या उपक्रमांतून स्थानिक समाजाच्या पुनर्निर्माणाचे काम केले आहे.

सुरजागड खाणीला मिळालेले हे पंचतारांकित रेटिंग केवळ एक औद्योगिक यश नसून गडचिरोलीच्या डोंगर-दऱ्यांतून साकारत असलेल्या हरित प्रगतीचा, सामाजिक समरसतेचा आणि पर्यावरणीय जबाबदारीचा राष्ट्रीय सन्मान आहे. हे यश म्हणजे जंगलातून उगम पावलेली आणि संपूर्ण देशात झळकणारी एक आदर्श यशोगाथा आहे.

Comments are closed.