Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गडचिरोली जिल्ह्यातील अपुऱ्या आरोग्य सुविधांचा मुद्दा खा. अशोक नेते यांनी मांडला लोकसभेत

  • जिल्हात वैद्यकीय महाविद्यालय मंजूर करा खा.नेते यांनी तारांकित प्रश्ना अंतर्गत संसदेत केली मागणी.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

नई दिल्ली, दि. 19 मार्च: देशातील मागास व आदिवासी क्षेत्रातील मलेरिया सारख्या दुर्धर आजारांच्या उपाययोजने संबंधीच्या  तारांकित प्रश्न संख्या 344 वर चर्चा करताना खासदार अशोकजी नेते यांनी अतिदुर्गम, आदिवासी बहुल, अतिमागास, नक्षल पीडित गडचिरोली- चिमूर लोकसभा क्षेत्रातील अपुऱ्या आरोग्य सुविधांची विदारक स्थिती विषद केली.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

       गडचिरोली- चिमूर लोकसभा क्षेत्रातील गरीब, आदिवासी नागरिकांसाठी मलेरिया, कॅन्सर, हृदयरोग, किडनी, लिव्हर,  हॅपाटायटीस- बी  इत्यादी दुर्धर आजारावर योग्य उपचारासाठी  अत्याधुनिक सुविधा जिल्ह्यात उपलब्ध नाही त्यामुळे या रोगांच्या उपचारासाठी गरीब नागरिकांना नागपूर येथे जावे लागते मात्र नागरिकांची आर्थिक स्थिती कमकुवत असल्याने त्यांना नागपूर येथे जाऊन उपचार करणे शक्य होत नाही त्यामुळे त्यांना आपला जीव गमवावा लागतो. ही बाब गंभीर असून शासनाने या आजारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी काही ठोस उपाययोजना तथा उचित निर्णय घेण्याची मागणी खासदार अशोक नेते यांनी आज दि 19 मार्च रोजी तारांकित प्रश्न दरम्यान लोकसभेत केली व आरोग्याच्या या प्रश्नाकडे सभागृहाचे लक्ष वेधले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

यावेळी लोकसभेत प्रश्न उपस्थित करतांना खासदार अशोक नेते म्हणाले,  येथील गरीब आदिवासी नागरिकांच्या दुर्धर आजारावर उपचारासाठी आदिवासी बहुल क्षेत्र असलेल्या गडचिरोली येथे मेडिकल कॉलेज मंजूर करून आरोग्याच्या सोयी -सुविधा प्रशस्त  करण्याची  मागणी यावेळी खासदार अशोक नेते यांनी लोकसभेत केली.

या प्रश्नांवर लोकसभेत उत्तर देताना केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी सांगितले की, देशाचे लाडके पंतप्रधान मा. श्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील रालोआ ( भाजपा ) चे सरकार संपुर्ण देशभरात आरोग्य सुविधांवर विशेष भर देत आहे. आदरणीय मोदीजीच्या नेतृत्वातील देशातील हे पहिले सरकार आहे ज्यांनी वैज्ञानिक पद्धतीने सर्व्हेक्षण करुन  पायाभूत सुविधा नसलेले देशातील 112 जिल्हे आकांक्षीत घोषित करून NHM च्या माध्यमातून पायाभूत सुविधा पुरविण्यात येत आहेत मागील  टर्म च्या 5 वर्षात 157 मेडिकल कॉलेज देशात सुरू करण्यात आले असून मागील वर्षी 75 कॉलेज मंजूर करण्यात आल्याचे  त्यांनी सभागृहात सांगितले. तसेच आकांक्षीत जिल्ह्यामध्ये तथा आदिवासी बहुल जिल्ह्यामध्ये अत्याधुनिक आरोग्याच्या सोयी- सुविधा निर्माण करण्याचा प्रयत्न केंद्र स्तरावर सुरू असून लवकरच तंत्रज्ञान युक्त अद्ययावत रुग्णालये  निर्माण होतील असेही त्यांनी यावेळी लोकसभेत सांगितले.

Comments are closed.