लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
आवळगाव, दि. २८ मार्च : आवळगाव, हळदा, चिचगाव, डोरली या संयुक्त सेवा सहकारी सोसायटीच्या दिनांक २७/०३/२२ रोज रविवार ला पार पडलेल्या अत्यंत चुरशीच्या, अतीतटीच्या लढतीत काँग्रेस समर्थित शेतकरी विकास पॅनलच्या १३ पैकी १२ उमेदवार विजय झाले आणि सेवा सहकारी सोसायटी वर परत आपले वर्चस्व कायम ठेवले.
विरोधी गटाला फक्त एका महिला उमेदवाराच्या विजयावर समाधान मानावे लागले.
शेतकरी पॅनल चा हा विजय म्हणजे त्यांनी मागील पंचवार्षिक काळात केलेल्या सर्वसामान्य जनतेच्या चांगल्या कामाची आणि सेवा सहकारी सोसायटीला नेऊन ठेवलेल्या विकासाच्या उंबरठ्याची पावती होय असे आवळगाव येथील जनतेच्या बोलक्या भावना होत्या.
शेतकरी विकास पॅनलचे विजयी उमेदवार व त्यांना पडलेली मते.
अनुसूचित जाती/ जमाती
१) योगराज हिरामण चौधरी – ४४१
विमुक्त/ भटक्या/ विशेष मागास
२) यादव नथू पराते – ४०२
इतर मागास प्रवर्ग
३) प्रशांत पंढरी झरकर – ४०८
महिला राखीव
४) मंजुळाबाई गणपत गिरडकर – ३८७
५) ललिता देवराव ठाकरे – ३७१
सर्वसाधारण गट
१) विठ्ठल चिंतुजी किनेकर – ३८८
२) केवळ सखाराम बाणबले – ३८४
३) दिवाकर बापूजी किरमीरे – ३५४
४) रामदास बाजीराव भोयर – ३५४
५) हरीदास बिसण नखाते – ३४३
६) किशोर देवराव राऊत – ३२८
७) केवळराम मुखरुजी मुसकर – ३२६
८) श्रावण काशीराम आंबोरकर – ३१०
वरील सर्व विजयी उमेदवारावर गावकऱ्यांनी अभिनंदनाचा वर्षाव केला.
महिला गटातील ललिता देवराव ठाकरे ह्या एकमेव विरोधी गटातील उमेदवार विजय झाल्या.
हे देखील वाचा :
समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचा सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आढावा
महत्वाच्या फलनिश्चिती क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरीत चंद्रपूर जिल्हा अव्वल
Comments are closed.