निवडणूक निरीक्षक राजेंद्र कटारा यांचेकडून मतदान यंत्र सज्ज करण्याच्या प्रक्रियेची पाहणी संवेदनशील मतदान केंद्राला भेट
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
गडचिरोली दि. ११: विधानसभा निवडणूकीकरिता २० नोव्हेंबर २०२४ रोजी होणा-या मतदानासाठी ईव्हीएम, व्हीव्हीपॅट यंत्र तयार करण्याची प्रक्रिया शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे आज पार पडली. निवडणूक निरीक्षक श्री राजेंद्र कटारा यांनी मतदान यंत्र सज्ज करण्याच्या प्रक्रियेची पाहणी केली. तसेच उमेदवारांच्या नावासंदर्भात तपासणी करून घेतली. त्यानंतर श्री कटारा यांनी कुंभी मोकाशा या संवेदनशील मतदान केंद्राला तसेच चांदाळा येथील मतदान केंद्राला भेट देवून पाहणी केली. मतदान केंद्रावर आवश्यक सुविधांची पुर्तता, तसेच स्वच्छता ठेवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
यावेळी 68 -गडचिरोली विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी राहुल कुमार मीना, सहायक जिल्हाधिकारी अमित रंजन उपस्थित होते.
Comments are closed.