Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

कोल्हापूर भाजपमुक्तच! उत्तर पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या जयश्री जाधव यांचा मोठा विजय; भाजपचे सत्यजीत कदम पराभूत

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 
कोल्हापूर, दि. १६ एप्रिल : कोल्हापूर उत्तर मतदारसंघासाठी  झालेल्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडी आणि काँग्रेसच्या उमेदवार जयश्री जाधव यांनी १८,९०१ मतांनी विजय मिळवला आहे. भाजपचे उमेदवार सत्यजीत कदम पराभूत झाले आहेत. या विजयामुळे कोल्हापूर उत्तर मतदारसंघाच्या पहिल्या महिला आमदाराचा मान जयश्री जाधव यांना मिळाला आहे.  कोल्हापूरच्या जनतेने स्वाभिमान राखला असल्याची प्रतिक्रिया जयश्री जाधव यांनी दिली आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

काँग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनामुळे ही जागा  रिक्त झाली होती. या पोटनिवडणुकीत त्यांच्या पत्नी जयश्री यांना मतदारांनी विजयी केले आहे. या निवडणुकीकडे काँग्रेसचे नेते, पालकमंत्री सतेज पाटील विरुद्ध भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील असेच पाहिले गेले होते. जाधव यांच्या विजयामुळे सतेज पाटील यांची सरशी झाली आहे, तर होम टर्फवरच भाजपच्या उमदेवाराचा पराभव झाल्याने चंद्रकांत पाटील यांची मात्र पिछेहाट झालेली आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

महाविकास आघाडीचे उमेदवार जयश्री जाधव यांना एकूण ९६ हजार २२६ इतकी मतं पडली तर भारतीय जनता पक्षाचे उमेदवार सत्यजित कदम यांना ७७ हजार ४२२ इतकी मतं पडली.
कार्यकर्त्यांचा जल्लोष

जोतिबाच्या नावानं चांगभल म्हणत महिलांनी कपाळाला गुलाल लावला. अण्णांच्या माघारी आपली जबाबदारी…अशी घोषणा देत महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. जयश्री जाधव यांच्या विजयानंतर फटाक्यांच्या आतषबाजी करण्यात आली.

राजेश क्षीरसागरांचा प्रभाव असलेल्या भागातही जयश्री जाधवांना ‘लीड’

शिवसेनेचा बालेकिल्ला असलेला कोल्हापूर उत्तर मतदारसंघ काँग्रेसला दिल्याने पोटनिवडणुकीत काय होणार? शिवसैनिक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा शब्द राखणार का? अशी चर्चा रंगली होती. मात्र, कट्टर शिवसैनिकांनी मुख्यमंत्र्यांचा शब्द राखल्याचे प्रभागांमध्ये झालेल्या मतदानावरून दिसून येत आहे. आमदार राजेश क्षीरसागर यांचा प्रभाव असलेल्या सिद्धार्थ नगर, बुधवार तालीम, खोलखंडोबा, शुक्रवार पेठ, शाहू उद्यान, शिवाजी चौक, शाहू टॉकीज, महाराणा प्रताप चौक, महानगरपालिका भागात जयश्री जाधव यांना लीड मिळाल्याचे दिसून आले आहे.

 

हे देखील वाचा : 

देशातील सर्वात उंच असलेल्या 105 फुट, महाकाय हनुमान मूर्तीला करण्यात आला जलाभिषेक

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आज प्रत्येक भारतीय स्त्रीसाठी पितृतुल्य आहेत : आंबेडकरी विचारवंत डॉ. विकास जांभूळकर, नागपूर विद्यापीठ

 

 

Comments are closed.