Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

अपारंपारीक पद्धतीने वीज निर्मिती करुन राज्याला आघाडीवर नेणार – महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण (महाऊर्जा) महासंचालक रविंद्र जगताप

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 
पुणे, दि. १६ एप्रिल : औद्योगिकीकरण आणि झपाट्याने वाढणारे नागरीकरण आणि विजेची वाढती मागणी तसेच पारंपरिक पध्दतीने वीज निर्मिती करण्यासाठी लागणाऱ्या इंधनाच्या भूगर्भातील साठ्यात घट होत आहे. विजेची मागणी आणि पुरवठा यामध्ये तफावत होत असल्याने अपारंपरिक पध्दतीने ऊर्जा निर्मितीला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. पवन ऊर्जा, सौर ऊर्जा, लघुजल विद्युत सहवीज निर्मिती अशा अपारंपरीक पध्दतीने वीज निर्मिती करुन महाराष्ट्राला देशात आघाडीवर घेऊन जायचे आहे असे प्रतिपादन महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण (महाऊर्जा) महासंचालक रविंद्र जगताप यांनी केले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

सौर उर्जा उत्पादन प्रदर्शनाचे उद्घाटन महाऊर्जाचे महासंचालक रविंद्र जगताप, महावितरणच्या पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता सचिन तालेवार, महाऊर्जाचे महाव्यवस्थापक विनोद शिरसाट, वनराईचे अध्यक्ष रविंद्र धारिया आणि मास्माचे अध्यक्ष राजेश मुथा यांच्याहस्ते झाले. यावेळी मास्माचे संचालक समीर गांधी, सचिव जयेश अकोले, शशीकांत वाकडे, संजय देशमुख, संजय कुलकर्णी, प्रदीप कुलकर्णी, नरेंद्र पवार, रोहन उपासनी उपस्थित होते.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

सुर्य उपासनेचे महत्व नागरिकांना माहितीच आहे. मात्र सुर्याच्या किरणांपासून मिळणार्याा ऊर्जेवर अन्न शिजवता येते, पाणी गरम करता येते, वीज निर्मितीदेखील केली जाते यासाठी विविध उपकरणे बाजारामध्ये उपलब्ध आहेत. सौर ऊर्जेचा प्रचार आणि प्रसार करताना येणार्याय अडणींवर मात करण्यासाठी महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण (महाऊर्जा) आणि महाराष्ट्र सोलर मॅन्यूफॅक्चरर्स असोसिएशन यांच्यामध्ये दर दोन महिन्याला बैठका घेऊन केली जाणार आहे. प्रदर्शनाच्या माध्यमातून नागरिकांशी सुसंवाद ठेवता येत असल्याचे पहायला मिळत असल्याचे रविंद्र जगताप म्हणाले.
महाऊर्जाचे महाव्यवस्थापक विनोद शिरसाट म्हणाले की, अपांपारिक ऊर्जा धोरणांतर्गत ठरलेले उद्दिष्ठ पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र सौर उत्पादक संघटना (मास्मा), महावितरण आणि महाऊर्जा एकत्रित येऊन काम करत आहेत. महाराष्ट्रातील लोडशेडींग विजेची मागणी वाढल्यामुळे होत आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यकतेनुसार विजेचा वापर करावा. वीज बचत केल्यास लोडशेडींग सारख्या समस्येला सामोरे जावे लागणार नाही.
सचिन तालेवार म्हणाले की, वीजेची वाढती मागणी लक्षात घेत ग्राहकांच्या हितासाठी सौर ऊर्जा उपकरणसंबंधी कार्यप्रणाली अधिक सुलभ करण्यासाठी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण (महावितरण) आणि महाराष्ट्र सोलर मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन (मास्मा) यांच्यावतीने सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी संयुक्त समित्यांची स्थापना देखील करण्यात आली आहे.
राजेश मुथा म्हणाले की, मास्मातर्फे सौर ऊर्जेचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी वैशिष्ट्यपूर्ण प्रदर्शानाचे आयोजन करण्यात आले आहे. महावितरणच्या विविध योजना ग्राहकांपर्यंत थेट पोहचवण्यासाठी याठिकाणी स्टॉलदेखील आहेत. सोलर वॉटर हिटर, सोलर ड्रायर, सोलर रेफ्रिजरेटर, सोलर कुलर जनरेटर, इन्व्हर्टर याबरोबरच विविध उपकरणे पाहण्यासाठी पुणेकरांना पहायला आणि खरेदी करायला मिळणार आहेत. तब्बल ४० हून अधिक सौर उर्जा उपकरण उत्पादकांची उत्पादने याठिकाणी प्रदर्शनात विक्रीसाठी आहेत. यामध्ये छोट्यात छोट्या वस्तू पासून ते मोठ्या उद्योजकांना लागणारी उपकरणे आहेत. सर्वसामान्य ग्राहक ते लघु मध्यम उद्योजक यांना विविध उपकरणे खरेदी करण्यासाठी या प्रदर्शनाचा फायदा होणार आहे.

 

हे देखील वाचा : 

कोल्हापूर भाजपमुक्तच! उत्तर पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या जयश्री जाधव यांचा मोठा विजय; भाजपचे सत्यजीत कदम पराभूत

देशातील सर्वात उंच असलेल्या 105 फुट, महाकाय हनुमान मूर्तीला करण्यात आला जलाभिषेक

 

Comments are closed.