Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

साताऱ्यात गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी केली कॉलेज परिसराची अचानक पाहणी..

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

सातारा, दि. १६ फेब्रुवारी :  साताऱ्यात मागील आठवड्यात कॉलेज परिसरात महाविद्यालयातील युवकांच्या दोन गटात राडा झाला होता. यावेळी युवकांनी मारामारी करत एका दुकानावर दगडफेक करून दुकानाची मोडतोड केली होती. याची गंभीर दखल राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी घेत या युवकांवर कडक कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना दिले होते.

आज देसाई यांनी साताऱ्यातील वायसी, शिवाजी या कॉलेज परिसरात जाऊन अचानक पाहणी करत युवक-युवतींशी संवाद साधला.. यावेळी महाविध्यालयीन युवतींनी कॉलेज परिसरात भीतीचे वातावरण नसल्याचे गृहराज्यमंत्र्यांना सांगितले. युवतीच्या सुरक्षेसंदर्भात पोलिसांकडून उपाययोजना करून त्याची अंमलबजावणी करण्याच्या सूचना पोलीस विभागाला यावेळी देण्यात आल्या असल्याचे देसाई यांनी सांगितले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे देखील वाचा : 

दहावी व बारावीच्या परीक्षांसाठी शाळा तेथे केंद्र/ उपकेंद्राची सुविधा.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ज्येष्ठ गायक, संगीतकार बप्पी लहरी यांना श्रद्धांजली

भीषण अपघात! कारची ट्रक्टरला धडक, धडकेत ४ जणांचा जागीच मृत्यू तर ९ जण गंभीर

 

Comments are closed.