Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

‘एनआयए’चा कोल्हापूरातील हुपरी परिसरात छापा, दोन संशयित ताब्यात..

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

कोल्हापूर, दि. ३१ जुलै: दहशतवादी संघटनांशी संबंध असल्याच्या संशयावरून एनआयए (NIA) वरिष्ठ अधिकारांचे पथकाने कोल्हापूर जिल्ह्यात हुपरी परिसरात रविवारी मध्यरात्री छापा टाकून दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. कोल्हापूर परिसरातील गोपनीय ठिकाणी त्यांची कसून चौकशी करण्यात येत आहे या सर्व घडामोडी पासून स्थानिक पोलीस यंत्रणा मात्र अनभिज्ञ आहे. तर दुसरीकडे नांदेड मध्ये देखील ‘एनआयए’च्या पथकाने छापा टाकला आहे. त्यामुळे NIA च्या छापेमारेमुळे कोल्हापूर जिल्हासह पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात प्रचंड खळबळ उडाली आहे.

ISIS या दहशतवादी संघटनेशी संबंधित २५ जून २०२२ रोजी झालेल्या एका गुन्ह्याचा तपास करण्यासाठी एनआयएने देशभरात मध्य प्रदेश, गुजरात, बिहार, कर्नाटक, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश या सहा राज्यांमध्ये छापेमारी केली आहे. एनआयएने देशभरात महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात, बिहार, कर्नाटक आणि उत्तर प्रदेश या सहा राज्यांमध्ये आज छापे टाकले आहेत. महाराष्ट्रात कोल्हापूर जिल्ह्यात हुपरीसह, नांदेड जिल्ह्यातील एकूण १३ ठिकाणांवर एनआयएने आज पहाटे चार वाजता छापेमारी केली आहे. कोल्हापूरमधील हुपरी येथून एनआयएने
इर्शाद शौकत शेख आणि अल्ताफ शेख या दोन संशयितांना ताब्यात घेतले आले. या संशयितांकडून संशयास्पद कागदपत्रे आणि साहित्य जप्त करण्यात आले आहे. त्यामुळे या अगोदर मराठवाड्यात असलेलं दहशत वाद्यांच्या स्लीपर सेल कनेक्शन आता पश्चिम महाराष्ट्रत सक्रिय झाल्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

महाराष्ट्रासोबत, मध्य प्रदेशातील भोपाळ आणि रायसेन जिल्ह्यात, गुजरातमधील भरूच, सुरत, नवसारी आणि अहमदाबाद मध्ये, बिहारमधील अररिया, कर्नाटक राज्यातील भटकळ आणि तुमकूर, उत्तर प्रदेशातील देवबंद या ठिकाणी NIA ने ही कारवाई केली आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.