Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

…अन् आ. संदीप क्षीरसागर चढले झाडावर; तर पालकमंत्री धनंजय मुंडे आंदोलन प्रमुखावर संतापले

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

बीड, दि. २६ जानेवारी : बीड नगर परिषदेच्या सफाई कामगार महिलांचे थकित वेतन मिळावे. या मागणीसाठी आज सकाळपासूनच दोन महिलांनी झाडावर चढून आंदोलन केले होते. दरम्यान याच आंदोलनस्थळी पालकमंत्री धनंजय मुंडे आणि बीडचे आमदार संदीप क्षीरसागर पोहचले होते. अखेर त्यांनी हे आंदोलन मिटवण्यासाठी थेट झाडावर चढत महिलांची समजूत घालण्यासाठी प्रयत्न केला.

या भेटीदरम्यान महिलांना झाडावर चढविल्याने आंदोलन प्रमुखावर पालकमंत्री धनंजय मुंडे चांगलेच संतापले होते. तर या महिलांना झाडावरून खाली उतरविण्यासाठी खुद्द आमदार संदीप क्षीरसागर थेट झाडावर चढले, आमदार क्षीरसागर यांच्या विनंती नंतर आंदोलनकर्त्या महिला खाली उतरल्या. नगराध्यक्ष काका भारतभूषण क्षीरसागर यांनी वेतन रखडले म्हणून कामगार महिला झाडावर चढल्या आणि पुतणे आमदार संदीप क्षीरसागर यांनी वचन देत आंदोलनकर्त्या महिलांना खाली उतरविल्याने जिल्हाधिकारी परिसरात चर्चेला उधाण आले आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

बीड नगर परिषदेच्या सफाई कामगार महिला कामगारांच्या वेतनाचा प्रश्न अनेक महिन्यांपासून प्रलंबित आहे. त्यामुळे यापूर्वी देखील या महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात असणाऱ्या झाडावर चढून चालू केलं होतं. आज पुन्हा झाडावर चढून आंदोलन केल्यानं प्रशासनाची मोठी तारांबळ उडाली होती.

हे देखील वाचा : 

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

प्रजासत्ताक दिनानिमित्त एका युवतीने भारतातील २६ वैशिष्ट्यांची साकारली रांगोळी….

समुद्रात असलेल्या दिपगृह जवळील एका खडकातील अप्रतिम दृश्यं

समुद्रकिनार्‍यावर आढळले भलेमोठे मृत कासव

 

 

Comments are closed.