Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

छत्रपती संभाजी महाराजांच्या ३४८ व्या राज्याभिषेकादिनाचा वर्धापनदिन उत्साहात साजरा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

रायगड, दि. ७ फेब्रुवारी : स्वराज्याचे पहिले युवराज आणि दुसरे छत्रपती शिवपुत्र संभाजी महाराज यांच्या राज्याभिषक दिनाचा ३४८ वा वर्धापन दिन आज मोठ्या उत्साहात किल्ले रायगडावर साजरा करण्यात आला.

तिथीनुसार माघ शुद्ध सप्तमीला संभाजी राजांचा राज्याभिषेक झाला होता.  महाडमधील छ. संभाजी महाराज राज्याभिषेकदिनोत्सव समिती गेली चार वर्ष हा महोत्सव साजरा करीत आहे.  आज शिवकालीन वेषभुषा परीधान करून शिवप्रेमींनी जल्लोश करीत केला.  ब्रह्मवृदाचे मंत्रोच्चार आणि शिवप्रेमींच्या जयघोषाच्या घोषणांच्या साथीने हा सोहळा पार पडला.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

ढोल ताशाच्या तालावर तरुण तरुणींनी मर्दांनी खेळांचे प्रात्याक्षिक सादर केले.  मान्यवरांच्या हस्ते संभाजी महाराजांच्या प्रतिमेवर सप्तसिंधूंचे जल, फुल आणि चलनातील नाण्यांचा अभिषेक करण्यात आला.  शिवप्रभुंची आरती आणि पालखी मिरवणुकीने या राज्याभिषेक सोहळ्याची सांगता करण्यात आली.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

“रायगडवरील कार्यक्रमांमध्ये सरकारी अधिकारी उपस्थित नसतात.  पुरातत्व विभागाचे अधिकारी देखील समोर येत नाहीत.  रायगडवरील कार्यक्रमांमध्ये सरकारी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीसाठी शासन निर्णय काढावा लागणार” असल्याचे मत महाडचे आमदार भरतशेठ गोगावले यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले.

हे देखील वाचा : 

होमिओपॅथिक औषधांचा वापर करून गोड मिरचीची लागवड…

नववधूची पाठवणी सजविलेल्या बैलगाडीतून!

धक्कादायक ! तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; अनैतिक संबंधातून महिला करायची ब्लॅकमेल

 

 

Comments are closed.