Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

इतर मागास वर्गीयांच्या प्रश्नांसदर्भात, मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक संपन्न.

Get real time updates directly on you device, subscribe now.

पदभरती, शिष्यवृत्तीसह विविध विषयांवर चर्चा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

मुंबई डेस्क ७ डिसेंबर :- इतर मागास वर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग यांच्या प्रश्नाविषयी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आज संपन्न झाली .
या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वड्डेटीवीर, वन मंत्री संजय राठोड, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, मुख्य सचिव संजयकुमार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजय मेहता, गृह विभागाचे अप्पर मुख्य सचिव सीताराम कुंटे, वित्त विभागाचे अप्पर मुख्य सचिव मनोज सौनिक, मुख्यमंत्र्यांचे अतिरीक्त प्रधान सचिव आशिषकुमार सिंग,मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, वित्त विभागाचे प्रधान सचिव राजगोपाल देवरा, इमाव बहुजन कल्याण विभागाचे प्रधान सचिव जे.पी.गुप्ता यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

या बैठकीत इतर मागास वर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास वर्ग यांच्या अनुशेष भरती, शिष्यवृत्ती, विभागाला आवश्यक निधी उपलब्धता तसेच विविध सवलतींचा लाभ देण्याबाबत चर्चा करण्यात आली.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.