Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

जिल्हाधिकारी नयना गुंडे यांनी सायकल चालवत दिला पर्यावरण बचाव सेहत बनाव चा दिला संदेश

गोंदियातील सायकल संडे ग्रुपच्या वतीने महिला दिनाचे अवचित्त साधून घेण्यात आला उपक्रम.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

गोंदिया, दि. ६ मार्च  :  महिला दिनाचे औचित्य साधून गोंदियातिल सायकल संडे ग्रुपच्या वतीने आज खास महिलांसाठी सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले असून गोंदियाच्या जिल्हाधिकारी नयना गुंडे यांनी देखील या उपक्रमात सहभाग घेत सायकल चालविण्याचा आनंद घेत पर्यावरण बचाव सेहत बनाव चा संदेश दिला असून या अभिनव उपक्रमात गोंदिया शहरातील शेकडो तरुणींनी मोठ्या संख्येत भाग घेतला .

गोंदिया शहरातिल सायकल संडे ग्रुप च्या वतीने ” एक दिन सायकल के नाम ” हा उपक्रम मागील २०७ आठवड्या पासून चवीला जात असून या उपक्रमा अंतर्गत दर आठवड्यात रविवारच्या दिवशी शहरातील तरुण तरुणी तसेच वायो वृद्ध देखील या उपक्रमात सहभाग घेत सायकल चालविण्याचा आनंद घेत पर्यावरणाचा समतोल आणि मानवी जीवन सुदृढ करण्या साठी जवळपास २० किलोमीटर सायकल चालवून सामाजिक संदेश देत असतात.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

या उपक्रमाची चर्चा आज गोंदियात तच नाही तर विदेशात देखील रंगू लागली असून हळू हळू का होईना राज्यातील बहुतांश जिल्यात तरुणाई आपल्या ठिकाणी हा उपक्रम राबवित असून मानवी जीवन सुदृढ करण्याचा संदेश देत आहेत . तर विशेष बाब म्हणजे गोंदियातील सायकल संडे गुप मध्ये १० वर्षाच्या तरुणांना पासून ८० वर्षांचा वृद्ध व्यक्ती देखील प्रामुख्याने सहभाग नोंदवित असून.गोंदियातील सायकल पट्टू मुनालाल यादव यांचा ८० वा वाढदिवस देखील या निमित्ताने आज सायकल संडेच्या वतीने साजरा करण्यात आला.

हे देखील वाचा : 

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

अनैतिक संबंधातून प्रियकराने केला प्रियसीच्या पतीचा खून…

येत्या काही दिवसात 70 रेल्वे स्टेशनला विमानतळाचं स्वरुप प्राप्त होणार – केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री दानवे

तब्बल 10 किलो सोन्यासह रोख रक्कमही पोलिसांनी केले जप्त

 

 

Comments are closed.