Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

काळविटाची शिकार करून मांसाची मेजवानी करणाऱ्या चौघांना रंगेहाथ केली अटक; वनविभागाची धडक कारवाई

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

वर्धा, दि. १८ डिसेंबर :  वर्धा जिल्ह्यातील देवळी तालुक्यातील भिडी नजीकच्या चोंडी शिवारात काळविटाची शिकार करून त्याच्या मांसाची मेजवानी केली जात असल्याची माहिती मिळताच वर्धा वनविभागाने धडक कारवाई करून चौघांना ताब्यात घेतले. या आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांच्याकडून काळविटाची कातडी व इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे.

वन्यजीवांची शिकार करणे हे कायद्यान्वये गुन्हा आहे. असे असले तरी देवळी तालुक्यातील चोंडी शिवारात अवैधपणे काळविटाची शिकार करून काळविटाच्या मांसची मेजवानी केली जात होती.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

सदर माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी रुपेश खेडकर यांना मिळताच त्यांनी वनपथकासह शुक्रवारी रात्री १०.३० वाजताच्या सुमारास देवळी तालुक्यातील चोंडी शिवार गाठून काळविटाच्या मांसाची मेजवानी करीत असलेल्या विश्वेश्वर हरिभाऊ सोनटक्के, नागसिंग संजय वाघमारे, रंजीत जगदीश टामठे व सुरेंद्र लक्ष्मण दांढेकर सर्व रा. चोंडी यांना ताब्यात घेत अटक केली.

            काळविटाची शिकार करून त्याच्या मांसाची मेजवानी करणारे आरोपी

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

मिळालेल्या माहितीनुसार शिकार केलेल्या काळविटाची आरोपींनी तळणी (खं.) येथील अनिल लक्ष्मण थुल यांच्या मालकीच्या शेतात हिस्सेवाटणी केली. त्यानंतर याच मांसाची मेजवानी करीत असताना चार आरोपींना वनविभागाच्या चमूने रंगेहात ताब्यात घेत अटक केली आहे.

वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी अटकेतील आरोपींकडून शिकार केलेल्या काळविटाची कातडी, नायलॉनचे तीन जाळे, काळविटाचे तुकडे करण्यासाठी वापरण्यात आलेले सतूर, कुऱ्हाड व विविध साहित्य तसेच काळविटाच्या मांसाची शिजविलेली भाजी व स्टिलचा डबा आदी साहित्य जप्त केले आहे.

 

सदर प्रकरणात आणखी काही आरोपी वाढण्याची शक्यता असून अटकेतील आरोपींच्या कबुली जबाबावरून विनोद नामक एक व्यक्ती या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार असल्याचे वनविभागाच्या आतापर्यंतच्या चौकशीत पुढे आले आहे. विनोद नामक आरोपी फरार असून त्याचा युद्धपातळीवर शोध घेतला जात आहे.

हे देखील वाचा : 

भारतीय कृषी संशोधन संस्थेत ६४१ जागांसाठी भरती

गडचिरोली येथील महावितरण कंपनीत प्रशिक्षणार्थी पदांच्या १०९ जागांसाठी भरती

प्रियसीने प्रियकरावर झाडली बंदुकीची गोळी!

 

 

 

Comments are closed.